Wednesday, September 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedअनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध ठाणे जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये* ...

अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध ठाणे जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये* *धडक कारवाईत 2 बार्ज, 1 सक्शन पंप, 11 वेल (कुंड्या )पाईप नष्ट*

 

*ठाणे,दि.3(जिमाका) :* मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल criminal writ petition नं.२९११/२०२२ च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताधिकारी उर्मिला पाटील, तहसिलदार उमेश पाटील यांच्यासह मुख्य पथक प्रमुख नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, ठाणे महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी अनधिकृतपणे रेती उत्खनन करणाऱ्याविरुद्ध ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.

जिल्हा प्रशासनाने अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या विरुद्ध मोहीम सुरू केली असून त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली जात आहे. या धडक कारवाईत ठाणे महसूल प्रशासनाने तब्बल काल (2 सप्टेंबर) रोजी 2 बार्ज, 1 सक्शन पंप, 11 वेल (कुंड्या )पाईप, जप्त करून नष्ट केल्या आहेत. यासाठी प्रशासनाने विविध पथके नेमली आहेत. त्याचबरोबर संबंधितांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

काल दि. 2 सप्टेंबर 2024 रोजी पथक प्रमुख निवासी नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांच्यासह मंडळ अधिकारी मुंब्रा व मंडळातील तलाठी यांनी मुंब्रा ते कल्याण दरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ होणाऱ्या अनधिकृत रेती उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी बोटीद्वारे गस्त घातली असता, खाडी पात्रामध्ये अनधिकृत रेती उत्खनन करणारी 45 ब्रास रेतीने भरलेली एक बार्ज तसेच एक सक्शन पंप आढळून आले.

अशाच प्रकारच्या दुसऱ्या कारवाईत खाडीपात्रामध्ये अनधिकृत रेती उत्खनन करणारी 25 ब्रास रेतीने भरलेली दुसरी बार्ज तसेच एक सक्शन पंप कळवा बाळकुम खाडीत आढळून आले. परंतु हे बार्ज व सक्शन पंप खाडीपात्रातून बाहेर काढता येत नसल्याने बार्ज व सक्शन पंप जाळून खाडीमध्येच बुडवून नष्ट करण्यात आले असून यापुढील कायदेशीर कार्यवाही सुरु आहे.

अशाच प्रकारे आतापर्यंत 2 बार्ज, 1 सक्शन पंप, 11 वेल (कुंड्या) पाईप जप्त करुन नष्ट करण्याची कारवाई देखील करण्यात आली असून या सर्व गुन्ह्यांबाबतीत कळवा पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे.

 

0000000000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments