Wednesday, September 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहिला उद्योजकता विकास शिबिर संपन्न * इंडसर्च सोसायटी फॉर...

महिला उद्योजकता विकास शिबिर संपन्न * इंडसर्च सोसायटी फॉर ॲडव्हान्स्ड स्टडीज, रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो व जागृती सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे,4 सप्टेंबर 2024 : इंडसर्च सोसायटी फॉर ॲडव्हान्स्ड स्टडीज, रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो आणि जागृती सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय महिला उद्योजकता विकास शिबिराचे आयोजन इंडसर्चच्या लॉ कॉलेज रोड येथील कॅम्पसमध्ये करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोच्या अध्यक्ष रोटेरियन अमिता नेने यांसह इंडसर्चचे सरसंचालक डॉ.अशोक जोशी, संचालिका डॉ.अपर्णा टेंबुलकर, जागृती सेवा संस्थेच्या संस्थापिका जयश्री काळे, महिला उद्योजकता विकास शिबिर च्या समन्वयक प्रा. अश्विनी जोशी, रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोचे खजिनदार रो. अमित आपटे, रो. प्रेरणा जोशी, इंडसर्चच्या युजी प्रोग्रामच्या डीन व इंटरनॅशनल रिलेशन्सच्या प्रमुख डॉ.सुनिता जोशी, फॅकल्टी समन्वयक प्रा.देवकी जैन, युजी समन्वयक प्रा.निलया मूर्ती व ज्येष्ठ प्राध्यापक सुवर्णा मसलेकर आदि मान्यवर उपस्थित होते. परिषदेच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर रोटेरियन शीतल शहा उपस्थित होते.

 

मानसिक आरोग्य सल्लागार रोटेरियन अमिता नेने यांनी कुटुंब आणि तणाव व्यवस्थापनामध्ये महिलांची भूमिका, इंडसर्चच्या प्राध्यापिका अश्विनी जोशी यांनी व्यवस्थापन आणि उद्योजकतेची मुलभूत तत्त्वे, भगिनी निवेदिता बँकेच्या प्रतिनिधींनी बँकिंगची आवश्यकता,बँक आणि सरकारकडून मिळणाऱ्या सुविधा अणि ऑनलाईन बँकिंगकरिता सूचना, मार्केटिंग – आवश्यकता आणि पध्दती या विषयावर प्रा.डॉ.वैशाली अजोतिकर,वित्त आणि खर्च व्यवस्थापन या विषयावर रोटेरियन सी.ए.पदमा शहाणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा.अश्विनी जोशी यांनी तीन यशस्वी महिला उद्योजकांशी संवाद साधला.

 

या दोन दिवसीय शिबिरात सहभागी झालेल्या 23 महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले. महिलांना विविध रोजगारांच्या संधी आणि प्रशिक्षणाच्या उपलब्ध संधींची माहिती देण्यासाठी महिला उद्योजकता विकास शिबिराचे आयोजन करण्यात येते.

 

महिला उद्योजकता विकास उपक्रमाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या 25 वर्षात आतापर्यंत 600 हून अधिक महिलांनी या उपक्रमातून सहभाग घेतला आहे आणि अनेक महिला यशस्वी लघुउद्योजक म्हणून कार्यरत आहेत. महिला उद्योजकता विकास उपक्रमाचे आधारस्तंभ असलेल्या इंडसर्चचे सरसंचालक डॉ.अशोक जोशी,महिला उद्योजकता विकास शिबिरच्या समन्वयक प्रा.अश्विनी जोशी आणि जागृती सेवा संस्थेच्या संस्थापिका जयश्री काळे यांच्या निरंतर समर्पण आणि योगदानासाठी रोटरी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर रोटेरियन शीतल शहा यांच्या हस्ते गौरव करण्यात

आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments