Wednesday, September 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोदरेज इंटेरियोतर्फे नावीन्यपूर्ण फर्निचर उत्पादनांसह भारतातील शिक्षण क्षेत्राला चालना आर्थिक वर्ष...

गोदरेज इंटेरियोतर्फे नावीन्यपूर्ण फर्निचर उत्पादनांसह भारतातील शिक्षण क्षेत्राला चालना आर्थिक वर्ष २५ पर्यंत बाजारपेठेतील १८ टक्के हिस्सा मिळविण्याचे उद्दिष्ट, भारतातील शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी गोदरेज इंटेरियोचा राज्य आणि खासगी शैक्षणिक संस्थांसह करार

मुंबई, ४ सप्टेंबर २०२४ – गोदरेज इंटेरियो हा घर आणि ऑफिससाठी फर्निचर बनविणारा भारतातील आघाडीचा ब्रँड व गोदरेज एंटरप्रायजेस समूहाची कंपनी असलेल्या गोदरेज अँड बॉयसचा भाग असलेल्या कंपनीने भारतातील शिक्षण क्षेत्रात लक्षणीय विस्तार केला आहे. कंपनी खासगी आणि सरकारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या शैक्षणिक संस्थांसाठी नावीन्यपूर्ण व खास तयार केलेली फर्निचर उत्पादने लाँच करत आहे.

 

योग्य बांधण व डिझाइन, तंत्रज्ञानाचा समावेश आणि शाश्वततेवर धोरणात्मक पद्धतीने लक्ष केंद्रित करत गोदरेज इंटिरेयोने २०२५ पर्यंत शैक्षणिक फर्निचर बाजारपेठेतील १८ टक्के हिस्सा मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कंपनीच्या अद्ययावत उत्पादनांद्वारे आधुनिक शालेय वर्गाच्या गरजा पुरविण्याचे ध्येय आहे. कंपनी लवचिक, टिकाऊ आणि उपयुक्त, विशेषतः शिकविण्याच्या विविध पद्धतींच्या गरजा पूर्ण करण्यावर भर देत फर्निचर बनवत आहे. पारंपरिक लेक्चर्सपासून डिजिटल लर्निंगपर्यंतच्या गरजा त्यातून पूर्ण केल्या जातील.

 

या विस्ताराविषयी गोदरेज इंटेरियोचे वरिष्ठ उपाध्यक्ष (बीटुबी) समीर जोशी म्हणाले, ‘शिक्षणामध्ये जगाचे भविष्य घडविण्याची ताकद असते. भोवताली असलेल्या वातावरणाची शैक्षणिक अनुभवाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका असते, असे गोदरेज इंटेरियोला वाटते. नावीन्य आणि दर्जाप्रति असलेल्या बांधिलकीतून आम्हाला स्मार्ट, आरामदायी, आकर्षक आणि सुरक्षित शैक्षणिक फर्निचर तयार करण्याची प्रेरणा मिळाली. तंत्रज्ञान आणि योग्य बांधणीचा उत्पादनांमध्ये समावेश करून आम्ही शिक्षक व विद्यार्थ्यांना पूरक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी मदत करत आहोत. यातून शिक्षणाच्या विविध पद्धती आणि शैलींचा समावेश करण्यासाठी आवश्यक जागा सहजपणे तयार केल्या जाऊ शकतात. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना चालना मिळते, तसेच आधुनिक व आरामदायी फर्निचर वापरताना सुरक्षित वाटते.’

 

गोदरेज इंटेरियोचे शैक्षणिक फर्निचर उत्पादने आणि सुविधा आधुनिक ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. कंपनीद्वारे वेगवेगळ्या इयत्तांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध आकाराच्या, अर्गोनॉमिक आणि आरामदायी सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या एका अहवालानुसार, ७९ टक्के विद्यार्थी वैयक्तिक गरज आणि गट चर्चेमध्ये उपलब्ध फर्निचरची पुनर्मांडणी करतात, तर ९४ टक्के शिक्षक वर्गाची रचना बदलल्यानंतर जास्त प्रभावीपणे शिकविता येत असल्याचे मान्य करतात.

 

गोदरेज इंटेरियोने विविध राज्य सरकारांबरोबर करार केला असून, त्यात तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि जम्मू व काश्मीर यांचा समावेश आहे. कंपनी या राज्यातील शैक्षणिक पायाभूत सुविधा उंचावणार आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये गोदरेज इंटेरियोने अशा भागीदारींच्या माध्यमातून २००,००० शालेय फर्निचर युनिट्स वितरित केले आहेत.

 

ब्रँड आपल्या शैक्षणिक फर्निचर सुविधांमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आघाडीवर आहे. कंपनीद्वारे तंत्रज्ञानावर आधारित फर्निचर उपलब्ध केले जाते, ज्यामुळे प्रत्यक्ष आणि डिजिटल शिक्षणाचा सहज मेळ घालता येतो. त्यासाठी बिल्ट इन मायक्रोफोन्स आणि वायर मॅनेजमेंट सीस्टिमसारख्या सुविधांचा वापर करण्या दोत आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments