Wednesday, September 23, 2026
Google search engine
HomeUncategorized*प्रा. डॉ. एम.एन.नवले, प्रा.डॉ.सिद्धार्थ जबडे, डॉ. संजय चाकणे आणि प्रा.डॉ. गणेश राऊत...

*प्रा. डॉ. एम.एन.नवले, प्रा.डॉ.सिद्धार्थ जबडे, डॉ. संजय चाकणे आणि प्रा.डॉ. गणेश राऊत यांना यंदाचा ८ वा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार* 

 

जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्तर्फे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन ; ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.पराग काळकर यांची उपस्थिती

 

पुणे : जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्च्या वतीने देण्यात येणारा 8 वा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार यंदा प्रा.डॉ. एम.एन.नवले, प्रा.डॉ.सिद्धार्थ जबडे, डॉ.संजय चाकणे, प्रा. गणेश राऊत यांना प्रदान करण्यात येणार आहे. रविवार, दिनांक ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता न-हे येथील प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. पुणेरी पगडी, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

पुरस्कार वितरण सोहळ्याला कोहिनूर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र -कुलगुरु डॉ.पराग काळकर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ६ वा प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर करंडक वितरण समारंभ देखील होणार आहे.

 

अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यांतर्गत आदर्श शिक्षण संस्थाचालक म्हणून सिंहगड टेक्निकल इन्स्टिटयूट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. एम.एन.नवले, आदर्श कुलगुरु म्हणून विश्वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सिद्धार्थ जबडे, आदर्श प्राचार्य म्हणून टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय चाकणे आणि एच.व्ही.देसाई कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचे प्रा.डॉ.गणेश राऊत यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

 

विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाबरोबर त्यांच्यातील कलागुण जोपासण्यासाठी शिक्षणसंस्थेकडून प्रयत्न केले जातात. त्यासाठी वर्षभरात विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामधील हा एक कार्यक्रम आहे. माणूस पैशांनी मोठा झाला तरी आपल्या शिक्षकांचे ऋण विसरू नयेत. त्यांचा आदर करणे ही विद्यार्थ्यांची जबाबादारी आहे. अशा शिक्षकांप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments