पुणे, 13 सप्टेंबर 2024: इंडियन ऑईलने पॅरिस 2024 पॅरालिम्पिक गेम्समध्ये भारताच्या पॅराऍथलीट्सच्या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी एका भव्य सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदकांसह 29 पदके मिळवून विक्रम केला.पॅरालिम्पिकमधील ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.देशातील पॅरालिम्पिक खेळांची सर्वोच्च संस्था असलेल्या पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया (पीसीआय) सोबत इंडियन ऑईल ने,ऑक्टोबर 2023 पासून पॅरा ऍथलीट्सच्या तुकडीला पाठिंबा देऊन या भारतीय पॅराऍथलीट्सना सक्षम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या कार्यक्रमाला माननीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री,श्रीमती रक्षा निखिल खडसे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव श्री पंकज जैन,इंडियन ऑईलचे चेअरमन आणि डायरेक्टर(मार्केटिंग) श्री व्ही सतीश कुमार ,वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि पीसीआय नेतृत्व हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
या खेळाडूंचे कौतुक करताना, माननीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री,श्रीमती रक्षा निखिल खडसे म्हणाल्या की, “भारतीय पॅरा ॲथलीट्सनी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपली असामान्य प्रतिभा दाखवली आहे.तुम्ही भारताच्या ताकदीचे आणि क्रीडा भावनेचे खरे राजदूत आहात.तुमचा संघर्ष, जिद्द आणि तुमचे विजय हे प्रेरणादायी घटक आहेत जे येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देतील.” इंडियन ऑईलच्या या उपक्रमावर प्रकाश टाकताना त्या पुढे म्हणाल्या की, इंडियन ऑईलने या खेळाडूंना दिलेला पाठिंबा कौतुकास्पद आहे आणि भारताच्या क्रीडा उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी कॉर्पोरेट भागीदारीची शक्ती दर्शवते.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव श्री पंकज जैन यांनी खेळाडूंचे कौतुक केले आणि आणि ते घोषणा करतांना म्हणाले की,इंडियन ऑईल मासिक शिष्यवृत्ती, वैद्यकीय विमा आणि स्पोर्ट्स किट प्रदान करून पॅराऍथलीट्सना आणखी मदत करेल. ते पुढे म्हणाले की, “आम्ही आमच्या क्रीडापटूंच्या चेहऱ्यावर हसू पाहू शकतो,जे आमच्या विद्यमान पदकांच्या संख्येत भर घालण्यासाठी सज्ज आहेत.केवळ पदक विजेत्यांचेच नव्हे तर खेळात सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे अभिनंदन.”
खेळाडूंच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त करताना, इंडियन ऑईलचे चेअरमन आणि डायरेक्टर(मार्केटिंग) श्री व्ही सतीश कुमार म्हणाले, “ही ऐतिहासिक कामगिरी आमच्या पॅराऍथलीट्सच्या दृढनिश्चयाचा पुरावा आहे.या अतुलनीय प्रवासात इंडियनऑईलला त्यांना साथ दिल्याचा अभिमान वाटतो आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहण्यास कटिबद्ध आहोत कारण ते अडथळे पार करत उत्कृष्टता प्राप्त करत आहेत.”
पीसीआय अध्यक्ष श्री देवेंद्र झाझरिया म्हणाले, “माझ्या खेळाडूंचा माझ्यावर विश्वास आहे आणि आम्ही आमच्या पुढील सामन्याची तयारी करत आहोत.आमच्या ऍथलीट्सना त्यांची सर्वोत्तम कामगिरी करण्यास सक्षम करण्यासाठी इंडियन ऑईलचा पाठिंबा महत्त्वाचा आहे.”
खेळाडूंना सशक्त करून आणि विविध क्षेत्रांतील प्रतिभेचे पालनपोषण करून भारताचे क्रीडा राष्ट्र बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर इंडियन ऑईल स्थिर आहे.इंडियन ऑईलचे हे समर्पण देशातील खेळांना चालना देण्यात महत्त्वाची भूमिका अधोरेखित करते.
इंडियन ऑईलने पॅरिस २०२४ पॅरालिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल भारतीय पॅरा- ऍथलीट्सचा गौरव केला राज्यमंत्र्यांनी केले इंडियन ऑईलच्या या उपक्रमाचे कौतुक
RELATED ARTICLES


