8 ते 13 ऑक्टोबर २०२४ दरम्यान रंगणार सांस्कृतिक महोत्सव
पुणे,२५ सप्टेंबर २०२४ : आधुनिक संकल्पना आणि पारंपरिकता यांचा अनोखा मिलाफ साधत विविध भारतीय सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून विविध समाजातील नागरिकांना एकत्र आणणार्या सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे सप्तपदी दुर्गा पूजा 2024 महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव पुण्यातील साफा बँक्वेटस, बालेवाडी हायस्ट्रीट येथे 8 ते 13 ऑक्टोबर 2024 दरम्यान संपन्न होणार आहे.या पाच दिवसीय अभिनव महोत्सवात दैनंदिन दुर्गा पूजा विधी बरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक बंगाली फूड फेस्टिवलचा समावेश असणार आहे.
याप्रसंगी बोलताना सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय बिस्वास म्हणाले की, दुर्गा मातेची राजवाडी पद्धतीची भव्य मूर्ती हे या उत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे. अत्यंत कर्णमधुर अशा रबिंद्र संगीताचे सादरीकरण विख्यात कलाकारांद्वारे करण्यात येणार असून या कार्यक्रमाला सर्व नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळेल अशी मला खात्री आहे.
या उत्सवाबाबत अधिक माहिती देताना खजिनदार राज भनोट म्हणाले की, 8 ते 13 ऑक्टोबर दरम्यान सुरू राहणार्या सप्तपदी दुर्गा पूजा महोत्सवामध्ये 8 ऑक्टोबर रोजी मायर बोधोन होणार आहे. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता दुर्गा पूजेला प्रारंभ होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता आमंत्रण व अधीबाश झाल्यानंतर रात्री 8 पासून सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. 10 ऑक्टोबर रोजी पहाटे 6 वाजून 50 मिनिटांनी पूजेला प्रारंभ होईल आणि सकाळी 9 पासून पुष्पांजली सादर करण्यात येईल. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता पूजा आणि पुष्पांजली होणार असून रात्री ७ वाजता संध्या आरती असणार आहे. 11ऑक्टोबर रोजी पहाटे 6 वाजून 24 मिनिटांनी संधी पूजा त्यानंतर बलिदान आणि सकाळी 9 पासून नवमी पूजा व पाठोपाठ पुष्पांजलीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7वाजता संध्या आरती होणार असून सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत. 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता पूजेला प्रारंभ होईल. 13 ऑक्टोबर रोजी विसर्जन होणार असून सकाळी 10 वाजता देवी बोरोन व सिंदूर दान हे कार्यक्रम पार पडतील.
या व्यतिरिक्त सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे आनंद मेळा ,पारंपरिक बंगाली भोग आणि फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टीव्हलमध्ये सहभागी होणार्यांना घरी तयार केलेले बंगाली पदार्थ तेथे आणून अन्य स्पर्धक व उपस्थितांबरोबर त्याचा आस्वाद घेण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे, अशी माहिती सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनचे सरचिटणीस सौमित्र कुंडू व खजिनदार राज भनोट यांनी दिली.
——
—-


