पुणे,26 सप्टेंबर 2024 : भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी व तीन चाकी उत्पादक असलेल्या कायनेटिक ग्रीन एनर्जी ॲन्ड पॉवर सोल्युशन्स लि.च्या दुचाकी व्यवसायाच्या वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्षपदी मानव मेहरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मानव मेहरा यांना भारतीय उद्योगात 26 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे.कंपनीचे डीलर नेटवर्क,बाजारपेठेतील विस्तार,विक्री व सेवा,उत्कृष्टता आणि देशभरात ब्रँडचे अस्तित्व अधिक मजबूत करण्यावर ते लक्ष्य केंद्रित करतील.


