Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedनळकनेक्शन तोडणीबाबतचा 'एसएमएस' फसवणूकीचा , नागरिकांनी फ्रॉड 'एसएमएस'ला बळी पडू नये;...

नळकनेक्शन तोडणीबाबतचा ‘एसएमएस’ फसवणूकीचा , नागरिकांनी फ्रॉड ‘एसएमएस’ला बळी पडू नये; महापालिकेचे नागरिकांना आवाहन

पिंपरी : पिंपरी – चिंचवड शहरामध्ये सध्या ज्या नागरिकांची पाणीपट्टी थकीत आहे अशा मालमत्तेचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू आहे. महापालिकेच्या माध्यमातून याबाबत नागरिकांना थकीत पाणीपट्टी भरण्याचे वेळोवेळी ‘एसएमएस’ द्वारे व इतर माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. परंतू, शहरात नागरिकांचे आज रात्री 9 वाजता नळकनेक्शन तोडण्यात येईल, अशा आशयाचे राकेश मिश्रा, महापालिका अधिकारी या नावाने व 8009015135 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करणारा फसवणूकीचा ‘एसएमएस’ पाठविण्यात येत आहे. असे ‘एसएमएस’ हे नागरिकांची फसवणूक करणारे असून याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे. असे महापालिकेकडून आवाहन करण्यात आले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments