Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorized'महाराष्ट्राची उद्योग भरारी' कार्यक्रमाचे गणेश कला क्रीडा मंच येथे रविवारी आयोजन*

‘महाराष्ट्राची उद्योग भरारी’ कार्यक्रमाचे गणेश कला क्रीडा मंच येथे रविवारी आयोजन*

 

पुणे, दि. २७: उद्योग विभागाच्यावतीने उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत गणेश कला क्रीडा मंच येथे २९ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित ‘महाराष्ट्राची उद्योग भरारी’ या कार्यक्रमाच्या वेळेत बदल झाला असून आता हा कार्यक्रम दुपारी ४ वाजता होणार आहे.

 

या कार्यक्रमास उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी, उद्योजक, उद्योजक संघटनाचे प्रतिनिधी, पत्रकार, वकील, शिक्षक व डॉक्टर असे २ हजार ५०० च्यावर निमंत्रित उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी हा कार्यक्रम २९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला होता.

 

यावेळी राज्यशासनाने उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी घेतेलेले निर्णय, राबविण्यात आलेल्या योजना, राज्यात आलेले नवीन प्रकल्प, झालेली विदेशी गुंतवणूक, निर्माण झालेला रोजगार आणि या माध्यमातून औद्यागिक क्षेत्रात घेतलेली उत्तुंग भरारी, उद्योग विभागाची पुढील वाटचाल व राज्यातील नागरिकांसाठी शासनाने जाहिर केलेल्या इतर विभागाच्या महत्त्वाच्या योजनांचीदेखील माहिती देण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाच्या पुणे कार्यालयाचे उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर यांनी कळविले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments