Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedशासकीय तंत्रनिकेतनच्या ‘स्पीक मकाय’ हेरिटेज क्लबचे उद्घाटन संपन्न

शासकीय तंत्रनिकेतनच्या ‘स्पीक मकाय’ हेरिटेज क्लबचे उद्घाटन संपन्न

पुणे, दि. २७ : पुणे येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या ‘स्पीक मकाय’ (सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक अँड कल्चर अमंग्स्ट युथ) हेरिटेज क्लबचे उद्घाटन प्रसिद्ध सतार वादक सहाना बॅनर्जी यांचे हस्ते करण्यात आले.

 

या कार्यक्रमास शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील, अधिव्याख्याता सुहास परांजपे, सीमा कोल्हे, तबलावादक संदिपान मुखर्जी आदी उपस्थित होते.

 

यावेळी श्री. पाटील म्हणाले, ‘स्पीक मकाय’ हेरिटेज क्लबचे वर्षभरात सर्वसाधारणपणे चार कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय लोकसंगीत, शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य व चित्रपट या वारशाची ओळख होऊन त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. अशा प्रकारचे हेरिटेज क्लब स्थापन करणारे शासकीय तंत्रनिकेतन, पुणे हे राज्यातील पहिले शासकीय तंत्रनिकेतन आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

या क्लबचे समन्वयक म्हणून अधिव्याख्याता श्री. परांजपे आणि सचिव म्हणून श्रीमती कोल्हे काम पाहत आहेत. उद्धाटनानंतर श्रीमती बॅनर्जी यांचे सतार वादन झाले व त्याला श्री. मुखर्जी यांनी तबल्यावर साथ दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments