पुणे, दि.28 सप्टेंबर 2024- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित दहाव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत साखळी फेरीत कॅप्स रेव्हन्स संघाने सलग दुसऱ्या विजयासह आपली विजयी मालिका कायम राखली.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत केदार नाडगोंडे, तन्मय चोभे, संस्कृती जोशी, सुचित्रा जोशी, अजय पटवर्धन, देवेंद्र राठी, अजिंक्य मुठे, विष्णू गोखले यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर कॅप्स रेव्हन्स संघाने ईगल्स संघाचा 4-3 असा पराभव करून दुसरा विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात ब्लॅक हॉक्स संघाने बदामीकर बझर्ड्स संघाचा 5-2 असा सहज पराभव करून पहिला विजय मिळवला. ब्लॅक हॉक्सकडून सिद्धार्थ साठे, राधिका इंगळहळीकर, हर्षद जोगाईकर, तन्मय आगाशे, गंधार देशपांडे, मधुर इंगळहळीकर, ईशा साठे, ईशा घैसास, चिन्मय जोशी, हेमंत करमरकर यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. अन्य लढतीत अदिती रोडे, श्रीदत्त शानबाग, दीप्ती सरदेसाई, प्रीती सप्रे, नीलेश केळकर, देवराज शहाणे, सोहम जोशी, गौतम लोणकर यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर रावेतकर कॉमेट्स संघाने फिनिक्स संघाचा 4-3असा पराभव करून विजयी सुरुवात केली.
निकाल: साखळी फेरी:
ब्लॅक हॉक्स वि.वि.बदामीकर बझर्ड्स 5-2(गोल्ड खुला दुहेरी 1: सिद्धार्थ साठे/राधिका इंगळहळीकर वि.वि. मिहिर विंजे/मकरंद चितळे 21-18, 13-21, 15-13; गोल्ड खुला दुहेरी 2: हर्षद जोगाईकर/तन्मय आगाशे वि.वि.तुषार नगरकर/नितीन कोनकर 21-10, 21-13; खुला दुहेरी 3: गंधार देशपांडे/मधुर इंगळहळीकर वि.वि.अर्जुन खानविलकर/मंदार विंजे 21-20, 21-12 महिला दुहेरी 4: ईशा साठे/ईशा घैसास वि.वि.रुचा ढवळीकर/श्रीश्री खटोड 21-06, 21-07; वाईजमन दुहेरी 5: बाळ कुलकर्णी/संजय शहा पराभुत वि.अविनाश दोशी/हेमंत पालांडे 09-21, 14-21; खुला दुहेरी 6: चिन्मय जोशी/हेमंत करमरकर वि.वि.संजय फेरवाणी/नकुल बेलवलकर 13-15, 18-09, 15-07; खुला दुहेरी 7: रोहन जोशी/आदित्य मडकेकर पराभुत वि.श्रेयस भामरे/इशान पारेख 15-13, 08-15, 13-15);
रावेतकर कॉमेट्स वि.वि.फिनिक्स 4-3 (गोल्ड खुला दुहेरी 1: बिपिन देव/बिपिन चोभे पराभुत वि.अनिश राणे/सारा नवरे 13-21, 11-21; गोल्ड खुला दुहेरी 2: अनिकेत शिंदे/पराग चोपडा पराभुत वि.मिहिर आपटे/ईशान लागु 18-21, 13-21; खुला दुहेरी 3: अदिती रोडे/श्रीदत्त शानबाग वि.वि.अभिजीत खानविलकर/अनिरुद्ध रांजेकर 21-10, 21-19; महिला दुहेरी 4: दीप्ती सरदेसाई/प्रीती सप्रे वि.वि.आनंदिता गोडबोले/तनया केळकर 21-10, 21-15; वाईजमन दुहेरी 5: नीलेश केळकर/देवराज शहाणे वि.वि.अनिल आगाशे/राजेश पारेख 21-13, 21-05; खुला दुहेरी 6: सोहम जोशी/गौतम लोणकर वि.वि.रोहित मेहेंदळे/समीर जोग 15-10, 14-15, 15-13; खुला दुहेरी 7: आदित्य भट/यश मेहेंदळे पराभुत वि.आदित्य अभ्यंकर/आर्यन सुतार 07-15, 15-10, 10-15);
कॅप्स रेव्हन्स वि.वि.ईगल्स 4-3(गोल्ड खुला दुहेरी 1: निनाद देशमुख/चंद्रशेकर आपटे पराभुत वि.अमित देवधर/देवेंद्र चितळे 07-21, 08-21; गोल्ड खुला दुहेरी 2: केदार नाडगोंडे/तन्मय चोभे वि.वि.रणजीत पांडे/रोहित भालेराव 21-09, 21-15; खुला दुहेरी 3: विमल हंसराज/चिन्मय चिरपुटकर पराभुत वि.अक्षय ओक/यश काळे 18-21, 21-14, 14-15; महिला दुहेरी 4: संस्कृती जोशी/सुचित्रा जोशी वि.वि.दिया मुथा/दीप्ती वाळिंबे 21-08, 21-13; वाईजमन दुहेरी 5: अजय पटवर्धन/देवेंद्र राठी वि.वि.सचिन जोशी/प्रशांत 21-00, 21-00; खुला दुहेरी 6: अजिंक्य मुठे/विष्णू गोखले वि.वि.अतुल ठोंबरे/अनिल देडगे 15-1 -12, 15-11; खुला दुहेरी 7: हरीश अय्यर/नीतल शहा पराभुत वि.विनित राठी/वरद चितळे 08-15, 07-15);
—
——–


