Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedबीएनसीएमध्ये 'चित्रकलेतून वास्तूरचनाशास्त्राच्या संरचनेचे प्रकटीकरण' कार्यशाळा

बीएनसीएमध्ये ‘चित्रकलेतून वास्तूरचनाशास्त्राच्या संरचनेचे प्रकटीकरण’ कार्यशाळा

पुणे, दि. 30: महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमध्ये (बीएनसीए) भूदृश्यवास्तूरचना (लॅण्डस्केप आर्किटेक्चर) विभागातर्फे ‘हाताने काढलेल्या चित्रांमधून वास्तूरचनाशास्त्रासाठी (आर्किटेक्चर) लागणाऱ्या संरचनांचे प्रकटीकरण’ (लँग्वेज ऑफ ग्राफिक्स फॉर डिझाईन) या विषयावर तीन दिवसांची कार्यशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली. त्यात बीएनसीएतील पहिल्या वर्षाच्या तसेच पदव्युत्तर वर्गांमधील मिळून २५ विद्यार्थ्यांनींनी सहभाग घेतला.

 

बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांच्या प्रेरणेतून तसेच संस्थेतील भूदृश्यकला विभागप्रमूख डॉ. स्वाती सहस्रबुद्धे यांच्या पुढाकारातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये डॉ. सहस्रबुद्धे यांच्यासह प्रा. अनुपमा बापट, प्रा. क्षितीजा कोल्हटकर आणि प्रा. मुक्ता कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. ह्या कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक होते प्रसिद्ध भूदृश्यरचनाकार आणि चित्रकार श्री नाईक.

 

विद्यार्थीवर्गात कम्प्युटरवरील तयार चित्रनिर्मितीचे तंत्रज्ञान तसेच विविध अॅप्स (उपयोजन आयुधे) यांचा वाढता वापर लक्षात घेता मानवी मेंदू-हात आणि डोळे यांच्या समन्वयातून सर्जनशील रेखाचित्रे काढण्याबाबत अनेक अडचणी निर्माण होत आहेत, असे डॉ. सहस्रबुद्धे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, भूदृश्यवास्तूरचनाशास्त्रातील मूर्त आणि अमूर्त संकल्पना या शब्दांचा वापराशिवाय सचित्र प्रकटीकरणातून व्हाव्यात हा या कार्यशाळेमागचा मुख्य उद्देश आहे. यातून सहभागी विद्यार्थ्यांमध्ये दृश्यकलेबद्दल रस निर्माण करत आत्मविश्वास वाढवणे, तशी पूरक कौशल्ये विकसित करणे आणि केवळ रेखाचित्रांमधून व्यक्त होणे शक्य होणार आहे.

 

डॉ. सहस्रबुद्धे पुढे म्हणाल्या की, या कार्यशाळेतून लॅण्डस्केप आर्किटेक्चरसाठी विद्यार्थ्यांमध्ये संकल्पनात्मक विचार करण्याची सवय लावणे, दृश्यकलेसाठी लागणारी विविध तंत्रे व माध्यमांच्या वापरातून हाताने काढलेली चित्रे व रेखांकने, माहितीपूर्ण संरचना आणि आकृत्या व आलेख शिकवण्यात आले. तसेच गुंतागुंतीच्या संरचना अभिव्यक्त करत त्यातून प्रभावी कथनशैलीच्या माध्यमातून संपर्क कौशल्यवृद्धीही शक्य होईल असे वाटते. नेहमीच्या तांत्रिक शिक्षणात आता विद्यार्थ्यांमध्ये स्वतःच्या हाताने काढता येणाऱ्या चित्रकौशल्यातून सर्जनशील संकल्पना अभिव्यक्त करणे तसेच दृश्यात्मक कल्पकता वाढवता येणे शक्य होईल.

 

श्री नाईक म्हणाले की, सध्या डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता स्वतःच्या हाताने रेखाचित्रे काढणे हे विद्यार्थी जवळपास विसरून गेले आहेत. वास्तूरचनाशास्त्रातील कोणताही साधा किंवा गुंतागुंतीचा विषय ते प्रत्येकवेळी तंत्रज्ञान व सॉफ्टवेअरच्या माध्यमातूनच समजून घेताना दिसतात. त्यासाठी लागणारी संकल्पित चित्ररचना ही स्व-कल्पकतेतून हातामध्ये व नंतर कागदावर जाणीवपूर्वक उतरवावी लागते. हे मूलभूत मानवी कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये पुर्नस्थापित करताना त्यासाठी लागणारा सातत्यपूर्ण सरावाची सवयही आम्ही या कार्यशाळेतून लावत आहोत.

 

प्रा. बापट म्हणाल्या की, डिजिटल संरचना (डिझाईन) काढण्याच्या आजच्या काळात हाताने काढलेली चित्रे ही लॅण्डस्केप आर्किटेक्चरमधील विविध संकल्पना व्यक्त करण्यासाठी असणारी अत्यावश्यक कौशल्ये आहेत. दृश्यात्मक सादरीकरणाचे ते केवळ एक प्रभावी साधन नसून त्यातून सर्जनशील नवकल्पना साकार करण्यासाठी तसा विचार करण्याची सवय लागणे आवश्य

क आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments