Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्काऊटिंगमध्ये संघपद्धतीच्या माध्यमातून एकत्रित कामाची भावना रुजविण्याचे मोलाचे कार्य कर्नल विक्रम...

स्काऊटिंगमध्ये संघपद्धतीच्या माध्यमातून एकत्रित कामाची भावना रुजविण्याचे मोलाचे कार्य कर्नल विक्रम पत्की (निवृत्त) यांचे मत ; श्री शिवाजी कुल संस्थेचा १०७ व्या वर्धापनदिनानिमित्त कुलरंग महोत्सवात श्रीवत्स सोफोश आणि संतुलन संस्थेला बालकार्य सन्मान प्रदान

पुणे : स्काऊटिंगच्या माध्यमातून प्रथमोपचारासारखी जीवनोपयोगी कौशल्ये श्री शिवाजी कुल संस्थेत प्रत्यक्ष मैदानावर शिकविली जातात. तसेच संघपद्धतीच्या माध्यमातून एकत्रित काम करण्याची संघभावना देखील आजच्या पिढीमध्ये रुजविण्याचे काम सुरु आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील कुलवीर संस्थेत एकत्रितपणे काम करतात, ही बाब कौतुकास्पद आहे, असे मत कर्नल विक्रम पत्की (निवृत्त) यांनी व्यक्त केले.

 

सदाशिव पेठेतील श्री शिवाजी कुल, पुणे या स्काऊट गाईड खुल्या पथकाचे १०७ वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने श्री शिवाजी कुल व माजी कुलवीर संघातर्फे गंज पेठेतील टिंबर मार्केटजवळील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन येथे कुलरंग महोत्सव व बालकार्य सन्मान प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ज्येष्ठ कुलवीर माधव धायगुडे, माजी कुलवीर संघाच्या अध्यक्षा योगिनी जोगळेकर, नरेंद्र धायगुडे, कुलाचे कुलमुख्य यश गुजराथी, श्लोक मराठे, साक्षी वाडकर आदी उपस्थित होते.

 

महोत्सवात बाल कार्य सन्मान २०२४-२५ वर्षासाठी श्रीवत्स सोफोश संस्था आणि २०२३-२४ वर्षासाठी संतुलन पुणे या संस्थांना प्रदान करण्यात आला. श्रीवत्स संस्थेतर्फे सीए सचिन अभ्यंकर व शर्मिला सय्यद यांनी आणि संतुलन पुणे तर्फे अ‍ॅड.बस्तू रेगे व अ‍ॅड.पल्लवी रेगे यांनी पुरस्कार स्विकारला. सन्मानचिन्ह, भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरुप होते.

 

महेश सूर्यवंशी म्हणाले, आत्ता आपण कौशल्य विकासाबाबत चर्चा करतो. मात्र, स्काऊटिंगच्या माध्यमातून श्री शिवाजी कुल संस्थेने १०७ वर्षांपासून कौशल्य विकास मुलांमध्ये रुजविण्याचे कार्य सुरु ठेवले आहे. खेळाच्या माध्यमातून संयम, विचारपद्धती, पराभव पचविण्याची क्षमता, विजय आत्मसात करण्याची क्षमता व नेतृत्वगुण मुले येथे शिकतात. पुण्याच्या मध्यवस्तीत मैदाने नाहीत. त्यात फक्त मुलांना खेळासाठी हे मैदान संस्था उपलब्ध करुन देत आहे, हे कौतुकास्पद आहे. राष्ट्र निर्मितीच्या कार्यात संस्थेचे हे मोठे योगदान आहे.

 

माधव धायगुडे म्हणाले, ह्यमुलांनी मुलांसाठी चालविलेली चळवळह्ण असे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या भारतातील सर्वात जुन्या स्काऊट-गाईड खुल्या पथकांपैकी श्री शिवाजी कुल ही एक संस्था आहे. दरवर्षी लहान मुलांसाठी कार्य करणा-या संस्थांना कुलातर्फे गौरविण्यात येते. सन २०२४-२५ वर्षाचा पुरस्कार ससून रुग्णालयाच्या आवारात कार्यरत असलेल्या श्रीवत्स, सोफोश या अनाथ मुलांचा सांभाळ करणा-या संस्थेला आणि सन २०२३-२४ वर्षाचा पुरस्कार दगडखाण कामगारांच्या मुलांसाठी अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या संतुलन, पुणे या संस्थेला देण्यात आला, असेही त्यांनी सांगितले. पुणे शहर भारत स्काऊट आणि गाईड स्थानिक संस्थेचे कार्यक्रमाला विशेष सहकार्य मिळाले आहे. यावेळी कुलरंग महोत्सवांतर्गत कुलवीरांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम देखील झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments