Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोणतीही कल्पना छोटी नसते ती मोठी करण्यासाठी विचार मोठे करा जागतिक...

कोणतीही कल्पना छोटी नसते ती मोठी करण्यासाठी विचार मोठे करा जागतिक स्तराचे स्टार्टअप तज्ञ सूरज जुनेजा ; धनकवडी येथील आदर्श मित्र मंडळ च्यावतीने व्याख्यानाचे आयोजन

पुणे : आज दररोज तंत्रज्ञानात नविन बदल होत आहेत. त्याचा वापर करून कमी लोकांमध्ये तुम्ही खूप काम करू शकता. त्यासाठी तुम्ही इतरांपेक्षा वेगळे काय करू शकता याचा विचार करा. कोणतीही कल्पना ही छोटी समजू नका तर ती सत्यात उतरविण्याचा प्रयत्न करा. छोट्या कल्पनेमध्ये देखील मोठा व्यवसाय उभा करण्याची ताकद असते. त्यामुळे कोणतीही कल्पना छोटी समजू नका ती मोठी करण्यासाठी तुमचे विचार मोठे करा, असे मत जागतिक स्तराचे स्टार्टअप तज्ञ सूरज जुनेजा यांनी व्यक्त केले.

 

धनकवडी येथील आदर्श मित्र मंडळ च्यावतीने मुक्तांगण शाळा सहकारनगर येथे जागतिक स्तरावर नविन स्टार्टअप मध्ये काय चालले आहे या विषयी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ढोलताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, नितीन पंडित, पियुष शाह, वैभव वाघ, सचिन जामगे, संदीप ओम्बासे, आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय निंबाळकर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची संकल्पना आदर्श मित्र मंडळचे उदय जगताप व रणधीर गायकवाड यांची होती. यावेळी सुरज जुनेजा यांनी कमी भांडवलातून स्टार्टअप, तसेच वाढती लोकसंख्या, बदलते तंत्रज्ञान याचा वापर करून नवनवीन कल्पना आमलात आणून छोटया छोटया स्टार्ट पासून फ्लाईंग कार पर्यंत स्टार्टअप कसे सुरू करावे याची अनेक उदाहरणे दिली.

 

सुरज जुनेजा म्हणाले, भारताची लोकसंख्या जास्त आहे. तुमच्याकडे देण्यासाठी चांगल्या गोष्टी असतील तर त्या इथे नक्कीच विकल्या जाणार. तुमचा ग्राहक इथे तयार आहे फक्त तुम्हाला नवीन कल्पना राबवून त्यांच्या गरजा भागवता आल्या पाहिजेत. तुमच्याकडे संधी उपलब्ध आहे.फक्त तुम्हाला योग्य विचार करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

उदय जगताप म्हणाले, आज भारत देश सर्वात जास्त लोकसंख्येचा देश असून सर्वात जास्त तरुणांची संख्या असणारा देश देखील आहे. देशातील तरुणांना जागतिक स्तरावर असणाऱ्या स्टार्टअप विषयी माहिती व्हावी व त्यातून मार्गदर्शन घेवून नविन स्टार्टअप सुरू करावेत या उद्देशाने परदेशात सुरू असणाऱ्या स्टार्टअप विषयी माहिती देण्यासाठी व्याख्यानपर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले. मंडळाच्यावतीने सातत्याने विद्यार्थी, महिला, गरीब गरजू यांच्या करीता विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते, असेही त्यांनी सांगितले. संजय भैलुमे यांनी सूत्रसंचालन केले. पराग ठाकूर यांनी प्रास्ताविक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments