Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedसहकाराची सकारात्मक बाजू समाजासमोर यायला हवी - राज्यपाल हरिभाऊ बागडे  ----...

सहकाराची सकारात्मक बाजू समाजासमोर यायला हवी – राज्यपाल हरिभाऊ बागडे  —- “सहकार महर्षी” ग्रंथाचे शिर्डी येथे प्रकाशन

 

पुणे, दि. ३ – महाराष्ट्र ही सहकार चळवळीची गंगोत्री आहे तर देशभरात सहकार क्षेत्र आता वाढू लागले आहे, अशावेळी सहकाराची सकारात्मक बाजू समाजासमोर आणण्याची जबाबदारी या चळवळीतील कार्यकर्त्यांची आहे, अशी अपेक्षा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी येथे व्यक्त केली. सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात ग्रंथ प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, प्रदेश अध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे, प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, चेतन लागू आणि ग्रंथाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी उपस्थित होते. याच समारंभात स्व. अण्णासाहेब गोडबोले स्मृती पुरस्काराने इचलकरंजीचे आमदार प्रकाशअण्णा आवाडे यांना सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्राच्या सहकार चळवळीत ज्यांनी आपले जीवन समर्पित केले अशा १७५ सहकार महर्षींच्या जीवन चरित्राची एकत्रित सचित्र माहिती असलेल्या सहकार भारती प्रकाशित या ग्रंथाची निर्मिती सहकार सुगंधने केली आहे. या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात बोलतांना बागडे पुढे म्हणाले की, सहकारातील अपप्रवृत्ती दूर केल्या पाहिजेत आणि ही चळवळ अधिक सक्षम केली पाहिजे. सर्वसामान्यांच्या समृद्धीसाठी सहकार क्षेत्राचे महत्त्व आता सर्वांना समजू लागले आहे. केंद्र सरकारने देखील सहकार चळवळीकडे विशेष लक्ष दिले आहे.

सहकार महर्षी ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीला भरघोस प्रतिसाद मिळाला. या ग्रंथाला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे तर विविध विद्यापीठांनी या ग्रंथाची विशेष शिफारस केली आहे.

सहकार चळवळीतील सर्वांनी अवश्य वाचावा, संग्रही ठेवावा असा हा ग्रंथ असल्याची माहिती संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय परमणे यांनी केले तर विवेक जुगादे यांनी आभार मानले.

——-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments