Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedयुद्धजन्य परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्माची सांगड हवी : ज्येष्ठ शास्त्रज्ञ...

युद्धजन्य परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्माची सांगड हवी : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे विचार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे आयोजित १० व्या जागतिक विज्ञान, धर्म/अध्यात्म आणि तत्त्वज्ञान संसदेच उद्घाटन

पुणे दि. ३ ऑक्टोबर ः” जागतिक शांतता दिवस साजरा करीत असताना दुसरीकडे अनेक देशात युद्धाचे सावट पसरले आहे. अशा युद्धजन्य परिस्थितीतून बाहेर येऊन जगात शांतता नांदावी. यासाठी विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालावी लागणार आह.” असे विचार ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे आयोजित जगातील सर्वात मोठ्या शांती घुमटात १० व्या जागतिक विज्ञान, धर्मे/अध्यात्म आणि तत्त्वज्ञान संसदेच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

या प्रसंगी ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, द पॉवर ऑफ वर्ल्डस फाउंडेशनच्या संस्थापक देबोरा सवाफ, डॉ डीनीस क्वॉर्डा, जैन धर्मगुरू आचार्य लोकेश मुनी, प्रा. रूझान पश्चू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.

तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ.मंगेश तु. कराड, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, संसदेचे मुख्य समन्वयक व प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पाडे उपस्थित होते.

डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, ” जागतिक शांततेच्या दिनी इराणहून इस्त्राइलवर २०० मिसाईल डागण्यात आले. दुसरीकडे रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीत जागतिक शांतता दिवस कसा साजरा करू शकतो. तसेच उच्च शिक्षणात व्यावसायिक अभ्यासक्रमाला अधिक देण्यात आले आहे. यामध्ये विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणे कठीण झाले आहे. अशवेळेस विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून नवी पिढी घडवू शकतो. अध्यात्म हे अनुभवांकर आधारित असून आत्मिक आणि मानसिक शांतता मिळते. वर्तमान काळात दलाई लामा, नेल्सन मंडेला,य मार्टिन ल्युथर किंग, म.गांधी यांच्याकडून प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे.”

डॉ.विजय भटकर म्हणाले, ” २१ व्या शतकात शांततेने जगू शकू का हा प्रश्न सातत्याने निर्माण झाला आहे. सध्याच्या काळात मशीन आणि मनुष्य अशी जोडी भयानक वाटत आहे. त्यातच कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदय झाला. त्यामुळे भविष्यात शांततेबाबत चिंता वाटते. डॉ. कराड यांनी जागतिक संसदेच्या माध्यमातून सुरू केलेले प्रयत्न, नक्कीच शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपयोगी पडणार आहेत.”

प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” जगात शांतता नांदावी ही आता काळाची गरज आहे. जगाची परिस्थितीकडे आपण पाहिल्यास संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, महात्मा गांधी यांचे विचार अंमलात आणावे. आपल्या विचारातून आळंदी, अयोध्या, अजमेर या शहरांना जोडावे लागणार आहे. त्यासाठी आपल्याला वर्ल्ड पीस डोममध्ये सुरू असलेल्या, संसदेचा नक्कीच फायदा होणार आहे. ”

देबोरा सवाफ म्हणाल्या,” शांतता आणि एकात्मिकता प्रस्थापित करणे सर्वांची जवाबदारी आहे. तसेच मुलांना शाळांमधून ’इमोशनल इंटेलिजन्स’ शिकवण्याची गरज आहे. त्याशिवाय आपण प्रगती करू शकणार नाही. संस्कृती, अध्यात्म, विज्ञानाला ’इमोशनल इंटेलिजन्स’, ’इमोशनल कोशंट’ची जोड दिल्यास, आपण उत्कृष्ट युवा पिढी आणि जागतिक नेते नक्कीच घडवू शकू.”

डॉ. डीनीस क्वॉर्डा म्हणाले,” विज्ञान, तंत्रज्ञान, मानवता मूल्ये आणि धर्माच्या माध्यमातून जगात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. युद्धाच्या छायेत जगणारे व्यक्तींना आता तंत्रज्ञान आणि अध्यात्माच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्यावर विचार करावा.”

राहुल कराड म्हणाले,” विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वक्षमता विकसित करायची आहे. यामध्ये शिक्षण संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. आपल्याला वाईट प्रवृत्तींकडून चांगल्याकडे जाण्याचा प्रयत्न अशा संसदेतून करायचा आहे.”

या नंतर ज्येष्ठ खासदार डॉ. करण सिंह आणि डॉ. टोड क्रिस्तोफरसन यांनी व्हिडिओ च्या माध्यमातून शांतते संदर्भात विचार मांडले.

डॉ. आर.एम. चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले.

सूत्रसंचालन डॉ. गौतम बापट

यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments