पुणे,14 ऑक्टोबर २०२४ : सराफी उद्योगातील १९२ वर्षांची विश्वासार्हता असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे पुण्यात चार भव्य दालने सुरू करण्यात आली आहेत. ही नवीन दालने ‘पीएनजी ज्वेलर्स’ची महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आपली उपस्थिती दर्शवितात. ज्यामुळे ग्राहकांना ब्रँडची उत्कृष्ट कारागिरी, शुद्धता आणि दागिन्यांची डिझाईनच्या विस्तृत श्रेणी अनुभवता येईल. या दालनांच्या उद्घाटनप्रसंगी बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता आणि लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी उपस्थित होते.
एनआयबीएम रोड येथील दालनाचे उद्घाटन ५ ऑक्टोबर २०२४ रोजी अभिनेत्री लारा दत्ता यांच्या हस्ते करण्यात आले. ६३५० चौरस फुटांच्या जागेत विस्तारलेले प्रशस्त आणि सुंदर मांडणी असलेले हे दालन ग्राहकांना खरेदीचा अतुलनीय अनुभव प्रदान करते. लार्ज फॉरमॅट असलेल्या या दालनात पारंपरिक आणि समकालीन अशा दोन्ही प्रकारातील सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनम दागिन्यांचे विस्तृत कलेक्शन उपलब्ध करण्यात आले आहे.
सिंहगड रोड येथील दालनाचे उद्घाटन ६ ऑक्टोबर २०२४ रोजी अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. 5750 चौरस फूटांच्या जागेत विस्तारलेल्या या दालनात अंगठ्या, कानातले, ब्रेसलेट, नववधूचे दागिने इत्यादी उपलब्ध असून दागिने प्रेमींसाठी हे दालन पसंतीचे ठिकाण बनेल.
चऱ्होली फाटा आणि आंबेगाव येथील दालनांचे उद्घाटन १० आणि ११ ऑक्टोबर २०२४ रोजी अभिनेता स्वप्निल जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. ३०३६ आणि ५७५० चौरस फूटांच्या रिटेल स्पेससह विस्तारलेल्या या दालनांमध्ये ‘पीएनजी ज्वेलर्स’चे उत्कृष्ट कलेक्शन उपलब्ध करण्यात आले असून हे ब्रँडची उत्कृष्टता आणि शुद्धता दर्शविते.
याप्रसंगी बोलताना ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.सौरभ गाडगीळ म्हणाले की, पुणे शहर हे आमच्यासाठी खास असून येथे असलेले मुख्य दालन हे ‘पीएनजी ज्वेलर्स’चा वारसा आणि ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. चार नवीन दालने सुरू करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ‘पीएनजी ज्वेलर्स’ ची आता महाराष्ट्रात एकूण 47 दालने आहेत. हा विस्तार आम्हाला आमच्या ग्राहकांच्या अधिक जवळ घेऊन जाणार असून परंपरा आणि कलाकुसरसाठी ओळखल्या जाणाऱ्या आमच्या उत्कृष्ट दागिन्यांची खरेदी करणे आणखी सोयीस्कर होईल. याप्रसंगी लारा दत्ता आणि स्वप्निल जोशी सहभागी होणे ही आमच्या आनंददायी बाब आहे. गेल्या दोन शतकांपासून आमची ओळख असलेल्या त्याच गुणवत्ता, कलाकुसर आणि विश्वासाने पुण्यातील ग्राहकांना यापुढेही सेवा प्रदान करण्यास आमची वचनबद्धता आहे.
एनआयबीएम रोड येथील दालनाचे उद्घाटन करताना लारा दत्ता म्हणाल्या की, या समारंभाचा भाग होणे हा माझ्यासाठी खास क्षण होता. दागिने हे फक्त परिधानापुरतेच नव्हे तर परंपरा, संस्कृती आणि वैयक्तिक शैलीचे प्रतीक आहे. ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या दागिन्यांची सुंदर श्रेणी येथील ग्राहकांना पसंतीस पडेल याची मला खात्री आहे.
तीन दालनांचे उद्घाटन करणारे स्वप्नील जोशी म्हणाले की, ‘पीएनजी ज्वेलर्स’ हा ब्रँड आपल्या ग्राहकांशी असलेले दृढ नाते आणि शुद्धतेच्या बांधिलकीसाठी ओळखला जातो. या नवीन दालनाच्या उद्घाटन समारंभाचा भाग बनणे ही एक सन्मानाची गोष्ट आहे आणि मला खात्री आहे की, हे पुण्यातील दागिने प्रेमींचे पसंतीचे ठिकाण बनेल.
या दालनांच्या उद्घाटनाचा भाग म्हणून पीएनजी ज्वेलर्स पुण्यातील आपल्या ग्राहकांना खास ऑफर देत आहे. ५ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०२४ दरम्यान सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ३० टक्क्यांपर्यंत सवलत आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १०० टक्के सवलत दिली जाणार आहे. नवरात्र सुरू होत असतानाच या ऑफरमुळे ग्राहकांना अनोख्या किमतीत आपल्या पसंतीचे व आलिशान दागिने खरेदी करता येणार आहेत.
या चार नवीन दालनांसह ‘पीएनजी ज्वेलर्स’ने आपला पुण्यातला विस्तार अधिक भक्कम केला असून उच्च गुणवत्तेचे दागिने अधिक लोकांपर्यंत पोहचतील. प्रत्येक दालनामध्ये पारंपारिक ते समकालीन दागिन्यांच्या डिझाईन्स उपलब्ध असून प्रत्येकासाठी आणि प्रत्येक प्रसंगासाठी पर्याय उपलब्ध आहे.


