Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedखडकवासला विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती

खडकवासला विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती

**

पुणे, दि. २३ : जिल्ह्यातील २११-खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून अमित कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिली आहे.

श्री. अमित कुमार यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-१०४ असा असून संपर्क क्रमांक ८४३२५२०२४४ असा आहे. निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी मनिष जाधव हे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९३०७८०८४८९ असा आहे. श्री. अमित कुमार सकाळी १० ते १२ या वेळेत व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे या ठिकाणी भेटतील, असे खडकवासला विधानसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments