Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedनामनिर्देशन प्रक्रियेसाठी येताना कोथरूड विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरामध्ये शक्यतो वाहन...

नामनिर्देशन प्रक्रियेसाठी येताना कोथरूड विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरामध्ये शक्यतो वाहन आणू नये- निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे*

पुणे, दि. २३: कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयाच्या परिसरात अपुरी जागा लक्षात घेता नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवार व प्रतिनिधींनी मतदारसंघाच्या कार्यालयाच्या शंभर मीटरच्या परिसरामध्ये शक्यतो वाहन आणू नये, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे यांनी केले आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे कार्यालय हे सध्या श्रीमती कै. अनुसयाबाई खिलारे मॉडेल स्कूल मनपा शाळा क्रमांक ५५ जी एरंडवणे पुणे येथे आहे. या शाळेच्या समोर पुरेसे मैदान नसून शाळेमध्ये प्रवेश करण्यासाठी अरुंद व एकेरी मार्ग आहे. उमेदवारां मार्फत नामनिर्देशन पत्र दाखल करताना शंभर मीटरच्या परिसरात उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधींची वाहने आल्यास १०० मीटर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन त्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र दाखल करताना गर्दी मुळे अडचण येऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन श्री.सुनील गाढे यांनी हे आवाहन केले आहे.

नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत असून त्यासाठी कार्यालयात येणाऱ्या उमेदवारांबरोबर भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जास्तीत जास्त पाच व्यक्तींना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रवेश देण्यात येईल, असेही श्री. गाढे यांनी कळविले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments