विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनजागृती*

तारां कित Avatar

*
पुणे दि. ११: केंद्र शासन पुरस्कृत योजना तळागळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे २४ नोव्हेंबर २०२३ पासून आयोजन करण्यात आले आहे. ही संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत सूरू राहणार असून यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना पीएम-स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान योजना कार्ड, आरोग्य तपसणी, आधार कार्ड विषयक सेवा, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना आदी विविध योजनांचा लाभ देण्यासोबत शासकीय योजनांची माहितीदेखील देण्यात येत आहे.

ही यात्रा पुणे पुणे जिल्ह्यातील १ हजार ३८५ गावात फिरणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३४७ ठिकाणी यात्रेचे आयोजन करण्यात आले असून सुमारे ६५ हजार नागरिकांना माहिती देण्यात आली आहे. २१ हजार ४३८ पेक्षा अधिक नागरिकांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला आहे.

बारामती तालुक्यात १२ डिसेंबर रोजी पळशी आणि लोणी भापकर, १३ डिसेंबर रोजी सायंबाचीवाडी आणि माळवाडी लोणी. इंदापूर तालुक्यात १२ डिसेंबर रोजी निरगुडे, म्हसोबाची वाडी, लाकडी, निंबोडी, १३ डिसेंबर रोजी भादलवाडी, डाळज नं. १ व डाळज नं.२. गावात ही यात्रा भेट देईल.

दौंड तालुक्यात १२ डिसेंबर रोजी देवकरवाडी व दहिटणे, १३ डिसेंबर रोजी मिरवडी व उंडवड. भोर तालुक्यात १२ डिसेंबर रोजी डेहेण, कोंडगाव, साळुंगण व सांगवी वे.खो., १३ डिसेंबर रोजी सांगवी हि.मा., येवली, संगमनेर, हर्णस, लव्हेरी व नऱ्हे गावात यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

मावळ तालुक्यात १२ डिसेंबर रोजी कशाळ व भोयरे, १३ डिसेंबर रोजी कल्हाट व निगडे, मुळशी तालुक्यात १२ डिसेंबर रोजी वांजळे व वेगरे, १३ डिसेंबर रोजी कातरखडक व आंधळे, हवेली तालुक्यात १२ डिसेंबर रोजी कोरेगाव मुळ व भवरापूर, १३ डिसेंबर रोजी नायगाव व व मांजरी खुर्द गावात ही यात्रा भेट देईल.

खेड तालुक्यात १२ डिसेंबर रोजी रासे, भोसे व काळुस, १३ डिसेंबर रोजी वाकी बु., संतोषनगर व बाकी खु., आंबेगाव तालुक्यात १२ डिसेंबर रोजी साकोरो म्हाळुंगे तर्फे आंबेगाव, पुरंदर तालुक्यात १२ डिसेंबर रोजी कोडीत खु. व कोडीत बु., १३ डिसेंबर रोजी भिवडी व पूर, शिरूर तालुक्यात १२ डिसेंबर रोजी खैरेवाडी व हिवरे, १३ डिसेंबर रोजी पिंपळे खालसा व मुखई गावात ही यात्रा भेट देईल.

जुन्नर तालुक्यात १२ डिसेंबर रोजी येणेरे (विठ्ठलवाडी) व काले, १३ डिसेंबर रोजी दातखिळवाडी व खिल्लारवाडी गावात संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी विविध योजनांची माहिती जाणून घ्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Tagged in :

तारां कित Avatar

More Articles & Posts