Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedलँक्‍सेस इंडियाला फिक्‍की केमिकल्‍स आणि पेट्रोकेमिकल्‍स पुरस्‍कार

लँक्‍सेस इंडियाला फिक्‍की केमिकल्‍स आणि पेट्रोकेमिकल्‍स पुरस्‍कार

मुंबई, नोव्हेंबर ०८, २०२४ – लँक्‍सेस इंडियाने केमिकल क्षेत्रातील ‘डिजिटेक फ्रण्‍ट रनर ऑफ द इअर’साठी फिक्‍की केमिकल्‍स अँड पेट्रोकेमिकल्‍स अवॉर्ड २०२४ जिंकला आहे. भारत सरकारच्‍या आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण आणि रसायने व खतांसाठी राज्‍यमंत्री श्रीमती अनुप्रिया पटेल यांच्‍या हस्‍ते लँक्‍सेसला हा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. याप्रसंगी भारत सरकारच्‍या रसायने व खते मंत्रालयाच्‍या रसायने व पेट्रोकेमिकल्‍स विभागाच्‍या सचिव श्रीमती निवेदिता शुक्‍ला वर्मा आणि क्षेत्रातील इतर भागधारक देखील उपस्थित होते.

१७ ऑक्‍टोबर २०२४ रोजी मुंबईमध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या समारोहामध्‍ये लँक्‍सेस इंडियाचे उपाध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक नमितेश रॉय चौधरी आणि पीटीएसईचे पूर्णवेळ संचालक व प्रमुख बलराम खोत यांनी कंपनीच्‍या वतीने डिजिटेक फ्रण्‍ट रनर ऑफ द इअर पुरस्‍कार स्‍वीकारला.

हा पुरस्‍कार कंपनीच्‍या क्षमतांवर भर देत डिजिटायझेशनप्रती, तसेच प्रक्रिया सुधारणा, मालमत्ता विश्‍वसार्हता, सुरक्षितता, शाश्‍वतता व खर्च बचत करणाऱ्या टूल्‍सप्रती कंपनीच्‍या कटिबद्धतेला सन्‍मानित करतो. आमच्‍या मूल्‍य साखळीमध्‍ये डिजिटल सोल्‍यूशन्‍सची धोरणात्‍मक अंमलबजावणी करत आम्‍ही कार्यरत सर्वोत्तमता व शाश्‍वत विकासाला चालना देत आहोत.

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्‍की) केमिकल व पेट्रोकेमिकल उद्योगाच्या विकासातील योगदानाबद्दल कंपन्यांचा सत्कार करण्यासाठी इव्हेंटच्या इंडिया केम सिरीजचा एक भाग म्हणून केमिकल आणि पेट्रोकेमिकल पुरस्कार समारंभाचे आयोजन करते.

या यशाबाबत मत व्‍यक्‍त करत लँक्‍सेस इंडियाचे उपाध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक नमितेश रॉय चौधरी म्‍हणाले, “आम्‍हाला हा प्रतिष्ठित पुरस्‍कार मिळाल्‍याने सन्‍माननीय वाटत आहे. नवीन तंत्रज्ञानांचा फायदा घेत आणि डिजिटल विचारसरणीचा अवलंब करत आम्‍ही आमच्‍या प्रक्रिया सुव्‍यवस्थित करतो आणि उत्‍पादकता, कनेक्‍टीव्‍हीटी व एकूण कंपनीच्‍या कामगिरीमध्‍ये सुधारणांना चालना देतो, ज्‍यामुळे आमचे ग्राहक, कर्मचारी व इतर भागधारकांना सुधारित मूल्‍य देता येते.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments