पुणे –
मनपा प्रशासनाने अनेक ठिकाणी अतिक्रमणाविरुद्ध कारवाई सुरु केल्यावर पुणेकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र ह्या कारवाया अतिशय अपुऱ्या आणि देखावा आहे असे पुणेकरांचे मत झाले असून, सर्व स्तरातून आणि सर्व भागातून शहरातील वाढत्या अतिक्रमणा विरोधात नागरिक तक्रार करत आहेत. कर्वेनगर असो किंवा विमाननगर, शहराच्या मध्यवस्तीचा भाग असो अथवा उपनगर, सर्वत्र मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण दिसून येते आणि यावरील कारवाई ही वर वरची असल्याचे ही लक्षात येते. अगदी ताजी कारवाई म्हणजे *पुणे मुंबई महामार्गालगत सूस पुलाच्या अलीकडे उभारलेल्या फर्निचर च्या दुकानांवरील धडक कारवाई !! येथे काही ठराविक शो रूम वर कारवाई झाली आणि पुढचे शोरूम जैसे थे…. सदर दुकाने अधिकृत आहेत का याचा कृपया खुलासा करावा.आणि कारवाई नंतर तेथील तोडलेल्या शेड उचलायची, साफ करायची जबाबदारी कोणाची ? तेथे तर व्यवस्थित विक्री सुरु आहे. एखाद्या गरीब भाजी विक्रेत्याचा माल आपण कसा लगेचच जप्त करतो तसा न्याय येथे नाही असे दिसते*.नळस्टॉप चौकातील नाईट लाईफ च्या तक्रारी देखील वाढत आहेत, येथे सर्वदर्शन सोसायटी ची परवानगी नसताना हॉटेल सुरु असून पहाटे पर्यंत तेथे धिंगाणा चालतो, तर रस्त्यावरील हातगाड्या ही उशिरापर्यंत सुरु असतात. रात्रीच्या वेळी मनपा अतिक्रमण कारवाई करत नसल्याने अश्यांचे फावते. ह्याचा नागरिकांना प्रचंड त्रास होतो.तक्रार केली तर अधिकारी / कर्मचारी संबंधितांना तक्रारदाराचे नाव सांगतात आणि त्यामुळे बहुतांश नागरिक तक्रारी करण्यास धजावत नाहीत.अशीच परिस्थिती सर्वत्र आहे, कारवाई झाल्यावर आठवड्याभरात ही सर्व अतिक्रमणे परत जैसे थे स्थितीत येतात आणि तेथे व्यवसाय सुरु होतात. यामागचे गुपित अर्थातच सर्वच जण जाणून आहेत. सध्या तर प्रशासक राज आहे आणि आपले उत्तम काम करण्याचे नाव लौकिक आहे…त्यामुळे धडक कारवाई करण्यास कोणाचा अटकावं असण्याचे कारण नाही. तरी आपण व्यक्तिशः ह्यात लक्ष घालून विनादबाव कारवाई करण्याचे आदेश द्यावेत व सामान्य पुणेकरांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी एक सजग पुणेकर या नात्याने
संदीप खर्डेकर.यांनी मनपा आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे केली आहे.
अतिक्रमण कारवाई बाबत संदिप खर्डेकर यांची मनपा आयुक्त यांच्याकडे मागणी
Share with
Tagged in :