पुढील पाच वर्षांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे टीसीएस फायनान्शियल इन्क्लुजन गेटवे सोल्युशन बँक ऑफ बडोदासाठी काम करेल, केंद्रीय पायाभूत सेवासुविधा प्रदान करेल आणि बँक सेवासुविधांपासून वंचित लोकांना अधिक चांगल्या सेवा देण्यात बँकेला मदत करेल.
हा विस्तारित करार बँक ऑफ बडोदासोबत १५ वर्षांच्या भागीदारीवर आधारित आहे आणि आर्थिक सेवा व सरकारी योजनांना गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यात टीसीएसची वचनबद्धता यामुळे मजबूत झाली आहे.
मुंबई, २० डिसेंबर, २०२४: आयटी सेवा, कन्सल्टिंग आणि बिझनेस सोल्युशन्स प्रदान करणारी, जागतिक स्तरावरील आघाडीची कंपनी, टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेसने (TCS) (बीएसई: ५३२५४०, एनएसई: TCS) पुढील पाच वर्षांमध्ये एन्ड-टू-एन्ड फायनान्शियल इन्क्लुजन सोल्युशन लागू करणे पुढे सुरु ठेवण्यासाठी भारतातील दुसरी सर्वात मोठी सार्वजानिक क्षेत्रातील बँक, बँक ऑफ बडोदासोबत आपल्या भागीदारीचा विस्तार केला आहे. या ऍप्लिकेशनवर दर दिवशी जवळपास १२ लाख व्यवहार केले जाऊ शकतात. बँकेच्या ५५,००० हुन जास्त एजंट्सना बँकिंग सेवांपासून वंचित ६ कोटींहून जास्त ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा प्रदान करण्यात मदत केली जाऊ शकते.
भागीदारीचा विस्तार करून बँक ऑफ बडोदासाठी टीसीएस आपले फायनान्शियल इन्क्लुजन गेटवे सोल्युशन उपलब्ध करवून देणे कायम ठेवेल, बँक डेटा केंद्रांमध्ये हार्डवेयर आणि सॉफ्टवेयरसहित केंद्रीय पायाभूत सोयीसुविधा प्रदान करेल आणि ऍप्लिकेशनला पाठिंबा व देखरेखीमध्ये मदत करेल. टीसीएस गरज भासेल त्याप्रमाणे कोणत्याही नवीन सेवांसाठी नियामक आवश्यकता आणि बँक व्यवसायाच्या आवश्यकता लागू करण्यासाठी ऍप्लिकेशनच्या परिवर्तन व्यवस्थापनामध्ये सेवांचे व्यवस्थापन देखील करेल.
खाते उघडणे आणि आयएमपीएस आणि एनईएफटी ट्रान्सफर यासारख्या बँकिंग सेवांव्यतिरिक्त, हे ऍप्लिकेशन आधार आणि डेबिट कार्डावर आधारित व्यवहार, जसे की, आर्थिक व त्याशिवाय इतर व्यवहारांचे प्रोसेसिंग देखील करेल. महत्त्वाच्या सरकारी विमा आणि पेन्शन योजनांमध्ये (प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना) नॉमिनेशन प्रक्रिया सहजसुलभ बनवेल, त्यामुळे बँकेला ग्रामीण व अर्ध-शहरी क्षेत्रांमध्ये आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा प्रदान करण्यात मदत मिळेल.
बँक ऑफ बडोदाचे फायनान्शियल इन्क्लुजन आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे जनरल मॅनेजर श्री विमल कुमार नेगी यांनी सांगितले, “या नवीन करारामध्ये आम्ही टीसीएसच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि नाविन्याचा लाभ घेऊ शकू, ज्यामुळे आमच्या संचालन क्षमता आणि स्पर्धात्मक लाभ अधिक चांगले होतील. अशा प्रकारच्या दीर्घकालीन व्यवस्था सस्टेनेबिलिटीला पूरक ठरतात, आणि आम्हाला बँकिंग सेवांपासून वंचित लोकांसाठी आर्थिक कमतरता कमी करण्यासाठी धोरणात्मक दृष्ट्या योजना तयार करण्यासाठी आणि संसाधने उपलब्ध करवून देण्यासाठी तयार करतात. ही भागीदारी सरकारच्या ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास, सब का प्रयास’ या व्हिजनशी निगडित आहे, हे व्हिजन आम्हाला आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या अधिकाधिक जवळ घेऊन जाते. नावीन्य, समर्पण आणि सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून आमचे उद्दिष्ट देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये समावेशक आर्थिक सेवा आणणे, लाखो लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे आणि भारताची आत्मनिर्भरता आणि विकासामध्ये योगदान देणे हे आहे.”
टीसीएस २०१० पासून बँक ऑफ बडोदाची एक विश्वसनीय तंत्रज्ञान भागीदार आहे. बँकेची डिजिटल पायाभूत संरचना मजबूत करण्यात आणि देशात फायनान्शियल इन्क्लुजन कार्यक्रमांसाठी एक बेंचमार्क स्थापित करण्यात टीसीएसने मोलाची मदत केली आहे. १७ देशांमध्ये जवळपास १६५ मिलियन ग्राहक असलेली बँक ऑफ बडोदा आणि टीसीएस यांच्या दरम्यान जवळपास १५ वर्षांच्या भागीदारीचा हा चौथा विस्तार आहे.
टीसीएसचे इंडिया बिझनेसचे व्हाईस प्रेसिडेंट आणि ऑपरेशन हेड, श्री मनोज इंदुलकर यांनी सांगितले, “टीसीएसला अभिमान वाटतो की, आम्ही एका मजबूत फायनान्शियल इन्क्लुजन इकोसिस्टिम निर्माण करण्यात बँक ऑफ बडोदासोबत जवळपास १५ वर्षे भागीदारी केली आहे. आम्ही देशभरात ५५,००० टचपॉईंट्सची स्थापना केली जाण्यास मदत केली आहे, त्यामुळे बँकिंग सेवांपासून वंचित लोकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचत आहेत. आम्ही या भागीदारीला नव्याने ऊर्जा प्रदान करण्यावर आणि ग्राहकांना या महत्त्वाच्या वर्गाला अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी नवीन सुधारणा करण्यावर ध्यान केंद्रित करत आहोत, पुढील पाच वर्षांसाठी ही भागीदारी वाढवताना आम्हाला खूप आनंद होत आहे. टीसीएसमध्ये, आम्ही श्रेणीमध्ये सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या व समावेशक विकासाला प्रोत्साहन देणाऱ्या तंत्रज्ञान प्रगतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
टीसीएसने मोठ्या स्तरावर सार्वजनिक सेवांमध्ये बदल घडवून आणून आणि या सेवांना देशभरातील नागरिकांसाठी सुलभ बनवून भारताच्या डिजिटल पायाभूत संरचनेला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. टीसीएसने विविध सार्वजनिक क्षेत्रांच्या बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, क्षेत्रीय ग्रामीण बँका आणि ऍपेक्स बँकांसाठी आपले फायनान्शियल इन्क्लुजन गेटवे सोल्युशन लागू केले आहे. टीसीएस भारतामध्ये आर्थिक समावेश बाजारपेठेच्या एका महत्त्वाच्या भागाचा डिजिटल कणा बनली आहे.


