Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedबन्सल वायर इंडस्ट्रीज लिमिटेडतर्फे 745 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी सादर

बन्सल वायर इंडस्ट्रीज लिमिटेडतर्फे 745 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी सादर

सर्वात मोठी स्टेनलेस स्टील वायर उत्पादन कंपनी आणि भारतातील आकारमानानुसार दुसरी सर्वात मोठी स्टील वायर उत्पादन कंपनी बन्सल वायर इंडस्ट्रीज लिमिटेडचे उत्पादन आर्थिक वर्ष 2023 मध्ये अनुक्रमे 72,176 MTPA आणि 206,466 MTPA असून त्यांचा बाजारपेठीय हिस्सा अनुक्रमे 20% आणि अंदाजे 4% आहे. (स्रोत: CRISIL अहवाल) कंपनीने 18 जानेवारी 2024 रोजी बाजार नियामक सेबीकडे आयपीओसाठी (प्राथमिक समभाग विक्री) डीआरएचपी सादर केला आहे.

 

 

 

ऑफरमध्ये 5/- रु. च्या दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा समावेश असून त्याचे मूल्य 7,450 दशलक्ष रु. (745 कोटी रु.)आहे. आयपीओ मधून मिळालेल्या निव्वळ उत्पन्नाचा वापर कंपनी आणि तिच्या उपकंपनीने घेतलेल्या सर्व किंवा काही थकबाकी कर्जाच्या काही भागाची परतफेड किंवा प्रीपेमेंट करणे, कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी निधी पुरवणे आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट हेतू यासाठी वापरण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे.

 

 

 

बन्सल वायर इंडस्ट्रीज ची स्थापना 1985 मध्ये झाली आणि कंपनी स्थापन झाल्यापासून, कंपनीने स्टील वायर उद्योगात एक विशिष्ट ओळख निर्माण करून दर्जेदार उत्पादने सातत्याने वितरित केली आहेत. ऑटोमोटिव्ह, सामान्य अभियांत्रिकी, पायाभूत सुविधा, हार्डवेअर, ग्राहकोपयोगी वस्तू, उर्जा आणि प्रसारण, कृषी आणि ऑटो रिप्लेसमेंट यासारख्या विविध क्षेत्रांना सेवा पुरवत 38 वर्षांच्या परंपरेसह कंपनीला तिच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओचा अभिमान आहे.

 

 

 

कंपनीने (i) सुविधा केंद्र I: B-35, राजेंद्र नगर औद्योगिक क्षेत्र, मोहन नगर, गाझियाबाद; (ii) सुविधा II: B-3 लोणी औद्योगिक क्षेत्र, गाझियाबाद; (iii) सुविधा III: B-5 आणि B-6 लोणी औद्योगिक क्षेत्र, गाझियाबाद आणि (iv) सुविधा IV: 43KM, माइलस्टोन, दिल्ली-रोहतक रोड, असौधा, बहादूरगड, झज्जर, हरियाणा येथे असलेल्या सध्याच्या चार उत्पादन सुविधांवर माइल्ड स्टील, उच्च कार्बन आणि स्टेनलेस स्टील वायर्सची 259,000 MTPA क्षमता स्थापित केली आहे. कंपनी दादरी, भारत येथे देशातील सर्वात मोठे सिंगल लोकेशन स्टील वायर उत्पादन सुविधाकेंद्र देखील स्थापन करत आहे आणि आशियातील ते सर्वात मोठे आहे.

 

 

 

कंपनी आपली उत्पादने ‘बन्सल’ या ब्रँड नावाखाली बाजारात आणते आणि त्यांची विक्री करते. सुरुवातीपासूनच विश्वासार्ह ब्रँड म्हणून त्यांचा बाजारपेठेत लौकिक आहे. उच्च कार्बन स्टील वायर, सौम्य स्टील वायर (कमी कार्बन स्टील वायर) आणि स्टेनलेस स्टील वायर अशा तीन प्रमुख विभागात कंपनी कार्यरत आहे. दादरी येथील आमच्या आगामी प्रकल्पातून स्पेशालिटी वायर्सच्या नवीन विभागाची देखील भर आम्ही घालणार आहोत. यामुळे कंपनीला आगामी आर्थिक वर्षात विकासास आणि बाजारपेठेतील स्थान उंचाविण्यात मदत होईल.

 

 

 

बन्सल वायरचा जागतिक स्तरावर महत्त्वाचा ठसा आहे आणि त्यांची उत्पादने ५० हून अधिक देशांमध्ये निर्यात होतात. (स्रोत: क्रिसिल रिपोर्ट) बांगलादेश, ब्राझील, फ्रान्स, जर्मनी, इस्रायल, इटली, नेदरलँड, दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि व्हिएतनाम या देशांमध्ये कार्यरत 14 जागतिक प्रतिनिधी आहेत.

 

 

 

एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड आणि डीएएम कॅपिटल अॅडव्हायझर्स लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅने

जर्स आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments