Wednesday, September 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedडी.एच.एल एक्स्प्रेस ने लाँच केली उत्सवाच्या काळात खास सूट डी.एच.एल एक्सप्रेस...

डी.एच.एल एक्स्प्रेस ने लाँच केली उत्सवाच्या काळात खास सूट डी.एच.एल एक्सप्रेस इंडिया सर्व आंतरराष्ट्रीय शिपमेंट्स वर 50% पर्यंत आणि सर्व स्वदेशी शिपमेंट्स वर 40% पर्यंत सूट देऊ करणार आहे जे ग्राहक स्वतःहून जाऊन भेटणार आहेत किंवा टयांच्या शिपमेंट्स ऑनलाइन पाठविणार आहेत, त्यांना 250 पेक्षा जास्त डी.एच.एल रिटेल आउटलेट्स वर सूट उपलब्ध आहेत ही ऑफर 15 जानेवारी 2025 पर्यंत वैध आहे

मुंबई, 26 डिसेंबर, 2024 : डी.एच.एल एक्सप्रेस उत्सवाचा काळ साजरा करताना किरकोळ (रिटेल) ग्राहकांना खास ऑफर्स आणि सूट उपलब्ध करून देत आहे. ही ऑफर दिनांक 15 जानेवारी 2025 पर्यंत वैध आहे आणि ग्राहकांना खास सुटचा वापर करून जागतिक स्तरावर 3 किलो ते 25 किलोपर्यंत भेटवस्तूंच्या शिपमेंट्स पाठविता येतील. देशभरातील डी.एच.एल च्या 250 हून अधिक किरकोळ (रिटेल) सेवा केंद्रांच्या विस्तृत नेटवर्कवर आणि तिच्या अधिकृत वेबसाइटवर या ऑफर्स उपलब्ध आहेत. स्टोअर मध्ये ऑफर वापरणे निवडणाऱ्या ग्राहकांना फक्त ‘फेस्टिव्हल50’ प्रोमो कोड वापरुन शिपमेंट्सचे बुकिंग करावयाचे आहे.

पर्यावरणास अनुकूल असे शिपिंग विकल्प निवडण्याचा पर्याय ग्राहकांना डी.एच.एल गोग्रीन प्लस सेवेच्या माध्यमातून उपलब्ध आहे. या सेवेत ‘बुक-अँड-क्लेम’ पद्धत वापरली जाते आणि तिच्या माध्यमातून ग्राहकांना विशिष्ट प्रमाणात शाश्वत विमान इंधन खरेदीच्या वेळी ‘बुक’ करता येते आणि नंतर त्यांच्या शाश्वततेच्या उद्दिष्टांच्या दृष्टीने हरितगृह वायू उत्सर्जन परिणामस्वरूप घटल्याचा ‘दावा’ करता येतो. शाश्वत विमान इंधनाचा वापर करून, डी.एच.एल च्या ग्राहकांना स्कोप 3 हरितगृह वायू उत्सर्जन कमी करता येते. डी.एच.एल ने जागतिक लॉजिस्टिक्स नेटवर्कच्या माध्यमातून हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याचे व्यापक ध्येय ठेवलेले असून हा उपक्रम या ध्येयाशी सुसंगत आहे.

सुट्टीचे दिवस हा असा काळ आहे जिथे प्रियजन एकमेकांना भेटवस्तू देतात आणि या आनंदी उत्सवात कुटुंबाने व मित्रांनी आपल्याला वेढल्यामुळे आपण खूप खुश असतो. असे असूनही, या उत्सवाच्या काळात कामाची किंवा प्रवासाची बांधिलकी किंवा अनपेक्षित परिस्थिती उद्भवणे प्रियजनांना एकमेकांशी पुन्हा भेटणे कठीण करू शकते. डी.एच.एल एक्सप्रेस ने उत्सवाचा उत्साह वाटून घेण्याचे महत्त्व ओळखले आणि म्हणून उत्सवाच्या काळातील शिपमेंट्सवर सूट देऊन कुटुंबांना जवळ आणण्याचे ध्येये ठेवले आहे. असे केल्याने त्यांना अंतराची परवा न करता सर्वात महत्वाच्या लोकांना हृदयस्पर्शी भेटवस्तू आणि विवेकी अनपेक्षित भेटवस्तू पाठविता येतील.

संदीप जुनेजा, उपाध्यक्ष – वाणिज्य (कमर्शियल), डी.एच.एल एक्सप्रेस इंडिया, ऑफरवर भाष्य करताना म्हणाले, “डी.एच.एल मध्ये आम्हाला खास शिपिंग सूट देऊन या उत्सवाच्या काळाला आणखी खास करण्याची उत्सुकता लागली आहे. आम्हाला जाणतो की वेळेवर भेटवस्तू व हृदयस्पर्शी संदेश पोहोचविणे महत्वाचे असते. त्यामुळे आमचे ग्राहक जवळ आणि दूर असलेल्या प्रियजनांशी संपर्क करू शकतील याची खात्री आम्ही करतो. याव्यतिरिक्त, आम्ही गोग्रीन प्लस सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून शाश्वततेसाठी बांधिलकी स्वीकारली आहे आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये विश्वासार्ह व कार्यक्षम सेवेच्या आमच्या वचनाशी सुसंगत पर्यावरणास अनुकूल समाधान प्रदान करण्यासाठी आमचे समर्पण या बांधिलकीमुळे स्पष्ट होते.

डी.एच.एल चे व्यापक जागतिक नेटवर्क 220 देश आणि प्रदेशांमध्ये पसरलेले असून त्याचा वापर ग्राहकांना त्यांच्या उत्सवाच्या भेटवस्तू सहज पाठवण्यासाठी करता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments