Wednesday, September 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वीर बालक दिनानिमित्त बाबा जोरावर सिंह जी आणि...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वीर बालक दिनानिमित्त बाबा जोरावर सिंह जी आणि बाबा फतेह सिंह जी यांना अभिवादन..

पिंपरी, दि. २६ डिसेंबर २०२४ :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने वीर बाल दिवसानिमित्त बाबा जोरावर सिंह जी आणि बाबा फतेह सिंह जी यांच्या स्मरणार्थ पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या थोर वीर बालकांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी विशेष अधिकारी किरण गायकवाड, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे बालाजी अय्यंगार तसेस विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments