Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedलिंक्‍डइनने प्रोफेशनल्‍ससाठी पुण्‍यातील टॉप इमर्जिंग रोजगारांची यादी शेअर केली

लिंक्‍डइनने प्रोफेशनल्‍ससाठी पुण्‍यातील टॉप इमर्जिंग रोजगारांची यादी शेअर केली

भारताची उदयोन्‍मुख स्‍टार्टअप राजधानी पुण्‍यामधील प्रोफेशनल्‍स आर्थिक अनिश्चितता असताना देखील करिअरच्‍या दिशेने धाडसी पाऊल उचलण्‍यास उत्‍सुक आहेत. जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल नेटवर्क लिंक्‍डइनच्‍या नवीन संशोधनामधून निदर्शनास आले आहे की, पुण्‍यातील १० पैकी जवळपास ९ (८९ टक्‍के) प्रोफेशनल्‍स २०२४ मध्‍ये नवीन रोजगाराचा विचार करत आहेत.

 

एआयमुळे कौशल्‍य परिवर्तनाला गती मिळत असताना लिंक्‍डइन डेटामधून निदर्शनास येते की, भारतात रोजगारांसाठी आवश्‍यक कौशल्‍यांमध्‍ये २०१५ पासून ३० टक्‍क्‍यांनी बदल झाला आहे. २०३० पर्यंत या कौशल्‍यांमध्‍ये जागतिक स्‍तरावर ६५ टक्‍क्‍यांनी बदल होण्‍याची अपेक्षा आहे. या परिवर्तनादरम्‍यान रोजगार शोधणे आव्‍हानात्‍मक ठरू शकते, पण पुण्‍यातील प्रोफेशनल्‍स निश्‍चयी आहेत. इतरांपेक्षा वरचढ ठरण्‍यासाठी शहरातील ७८ टक्‍के प्रोफेशनल्‍स त्‍यांच्‍या रोजगार शोधामध्‍ये यशस्‍वी होण्‍याकरिता नवीन मार्गांचा प्रयत्‍न करत आहेत. ८९ टक्‍के प्रोफेशनल्‍स रिक्रूटर्सना त्‍यांचे रिझ्यूम/सीव्‍ही (उदाहरणार्थ व्हिडिओ फॉर्मेट, डिजिटल रिझ्यूम) सादर करण्‍यासाठी नवीन मार्गांचा शोध घेत आहेत, तर तितकेच (८९ टक्‍के) प्रोफेशनल्‍स त्‍यांचे प्रोफेशनल नेटवर्क वाढवण्‍याप्रती अधिक सक्रिय होत आहेत. ते एआयचा वापर करण्‍यास देखील उत्‍सुक आहेत, जेथे ८९ टक्‍के प्रोफेशनल्‍स म्‍हणतात की त्‍यामुळे त्‍यांना अधिक कार्यक्षमपणे व उत्‍पादकतेसह रोजगार शोधण्‍यास मदत होऊ शकते.

 

प्रोफेशनल्‍सला योग्‍य मार्गदर्शन करण्‍यासाठी लिंक्‍डइनने पुण्‍यातील जॉब्‍स ऑन द राइजची यादी सादर केली आहे:

 

1. सेल्‍स डेव्‍हलपमेंट रिप्रीझेन्‍टेटिव्‍ह

 

2. बीआयएम आर्किटेक्‍ट

 

3. डिमांड जनरेशन असोसिएट

 

4. ग्रोथ स्‍पेशालिस्‍ट

 

5. सोर्सिंग मॅनेजर

 

6. क्‍वॉलिटी कंट्रोल अॅनालिस्‍ट

 

7. कस्‍टमर सक्‍सेस स्‍पेशालिस्‍ट

 

8. बिझनेस डेव्‍हलमपमेंट रिप्रीझेन्‍टेटिव्‍ह

 

9. एन्‍व्‍हायरोन्‍मेंट, हेल्‍थ अॅण्‍ड सेफ्टी मॅनेजर

 

10. डेटा मॅनेजर

 

या वर्षात भारतातील ९५ टक्‍के रिक्रूटर्स नवीन टॅलेंटचे स्‍वागत करण्‍याचे नियोजन करत असताना लिंक्‍डइनची त्‍यांना योग्‍य उमेदवार शोधण्‍यास मदत करण्‍याची आणि त्‍यांच्‍या कर्मचारीवर्गाला भावी कौशल्‍यांसह सुसज्‍ज करण्‍याची इच्‍छा आहे. यासंदर्भात लिंक्‍डइनने नवीन जनरेटिव्‍ह एआय टूल्‍सचा प्रयोग केला आहे:

 

· रिक्रूटर २०२४: लिंक्‍डइनचे नवीन एआय-असिस्‍टेड रिक्रूटिंग अनुभव हायरिंग अधिक कार्यक्षम व सुलभ करते, ज्‍यामुळे टॅलेंट प्रमुख धोरणात्‍मक, कर्मचारी-केंद्रित कामावर लक्ष केंद्रित करू शकतात. हायरर्स साध्‍या भाषेतील सर्च प्रॉम्‍प्‍ट्स जसे ‘मला सीनियर ग्रोथ मार्केटिंग लीडरला नियुक्‍त करायचे आहे’ आणि लिंक्‍डइनचे एआय मॉडेल्‍स यांचा वापर करू शकतात. लिंक्‍डइनवरील १ बिलियनहून अधिक प्रोफेशनल्‍सकडून अनोखी माहिती, ६७.१ दशलक्ष कंपन्‍या आणि ४१,००० कौशल्‍ये यामधून हायरर कोणत्‍या प्रकारच्‍या उमेदवाराचा शोध घेत आहे याची माहिती मिळू शकते, तसेच उमेदवारांच्‍या व्‍यापक समूहामधून उच्‍च दर्जाच्‍या उमेदवारांच्‍या शिफारसी मिळू शकतात.

 

· लिंक्‍डइन लर्निंगचे एआय-समर्थित कोचिंग: लिंक्‍डइन सर्व प्रकारच्‍या रोजगारांसाठी आवश्‍यक व मागणीमध्‍ये असलेली दोन कौशल्‍ये: नेतृत्‍व व व्‍यवस्‍थापन यासंदर्भात रिअल-टाइम सल्‍ला देत आहे. लर्नर्स प्रश्‍न विचारू शकतात जसे ‘मी प्रभावीपणे टास्‍क्‍स व जबाबदाऱ्या कशाप्रकारे सोपवू शकतो?’ यासाठी वन-साइज-फिट्स-ऑल उत्तर देण्‍याऐवजी ते तुम्‍हाला तुमची विशिष्‍ट स्थिती व अनुभव अधिक स्‍पष्‍टपणे समजून घेण्‍यासाठी प्रश्‍नाचे स्‍पष्‍टीकरण विचारेल आणि त्‍यानंतर लिंक्‍डइन लर्निंगच्‍या तज्ञ प्रशिक्षकाकडून शेकडो तासांच्‍या कन्‍टेन्‍टच्‍या आधारावर सल्‍ला, उदाहरणे व अभिप्राय देईल.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments