Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedतुळशीबाग राम मंदिरात रामराज्याभिषेक सोहळा साजरा श्रीरामजी संस्थान तुळशीबाग तर्फे आयोजन...

तुळशीबाग राम मंदिरात रामराज्याभिषेक सोहळा साजरा श्रीरामजी संस्थान तुळशीबाग तर्फे आयोजन ; सलग १२ तास विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुणे : सियावर रामचंद्र की जय… पवनसुत हनुमान की जय… च्या जयघोषात आणि पुणेकरांनी केलेल्या पुष्पवृष्टीमध्ये पेशवेकालीन तुळशीबाग श्रीराम मंदिरात रामराज्याभिषेक सोहळा पार पडला. सोमवारी सकाळपासून रात्रीपर्यंत सलग १२ तास धार्मिक, सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन मंदिरात करण्यात आले होते.

 

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण व रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्रीराम मंदिरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त राघवेंद्र तुळशीबागवाले, विश्वस्त भरत तुळशीबागवाले, डॉ.रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.

 

सोमवारी रामरक्षा स्तोत्र पठणापासून कार्यक्रमांना प्रारंभ झाला. रामपंचायतन अभिषेक महाभिषेक व पवमान अभिषेक आणि त्यानंतर श्रीराम राज्याभिषेक सोहळा पायघड्या कार्यक्रम तुळशीबाग कुटुंबियांच्या वतीने झाला. कीर्तनकार विश्वासबुवा कुलकर्णी यांचे लळीताचे कीर्तन यावेळी झाले.

 

अयोध्येतील सोहळा लाईव्ह स्वरूपात पाहण्यासाठी दोन भव्य स्क्रीनची सोय देखील मंदिर परिसरात करण्यात आली होता. यावरून भक्तांनी थेट अयोध्येतील सोहळ्याचा आनंद घेतला. तसेच सुधारामायणाची गाणी, स्वरतरंग श्रीराम भक्तीगीते, बालप्रतीभा रामचरणी, कथक नृत्य सादरीकरण झाले. सायंकाळी श्रीरामाची पालखी प्रदक्षिणा मंदिरात पार पडली. यामध्ये रामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments