Wednesday, September 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedअँथेम बायोसायन्सेस लिमिटेडने 3,395 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी डीआरएचपी दाखल केले

अँथेम बायोसायन्सेस लिमिटेडने 3,395 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी डीआरएचपी दाखल केले

अँथेम बायोसायन्सेस लिमिटेड, नावीन्यपूर्णतेचा ध्यास घेऊन आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून, कॉन्ट्रॅक्ट संशोधन, विकास आणि उत्पादन क्षेत्रात काम करते. पूर्णपणे एकीकृत संचालन असलेली ही कंपनी औषधांचा शोध लावणे, ती विकसित करून त्यांचे उत्पादन करण्याचे काम करते. अँथेम बायोसायन्सेस लिमिटेडने सेबीकडे आयपीओसाठी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केले आहे.

या बंगलोर-स्थित कंपनीच्या आयपीओमध्ये समभाग विक्री करू इच्छिणाऱ्या समभागधारकांकडून 3,395 कोटी रुपयांपर्यंतचे इक्विटी समभाग विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात आले आहेत.

विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये समभाग विक्री करू इच्छिणारे प्रमोटर गणेश सांबशिवम आणि के रवींद्र चंद्रप्पा यांच्याकडून प्रत्येकी 350 कोटी रुपयांपर्यंतचे इक्विटी समभाग विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात येत आहेत. समभाग विक्री करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये व्हिरीडीटी टोन एलएलपी (ट्रू नॉर्थ) यांच्याकडून 1325 कोटी रुपयांपर्यंत, पोर्ट्समाऊथ टेक्नॉलॉजीज एलएलसी यांच्याकडून 320 कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी समभागांचा समावेश आहे. समभाग विक्री करू इच्छिणाऱ्या इतर समभागधारकांमध्ये प्रकाश करियाबेटन यांच्याकडून 80 कोटी रुपयांपर्यंत आणि के रामकृष्णन यांच्याकडून 10 कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी समभागांच्या समावेश असणार आहे.

2006 साली सुरु करण्यात आलेल्या या कंपनीच्या दोन ऑपरेशनल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज भारतामध्ये आहेत, दोन्ही कर्नाटकमध्ये असून यापैकी युनिट 1 बोम्मासांद्रा येथे आणि युनिट 2 हरोहल्ली येथे आहे. त्यांची वार्षिक कस्टम सिंथेसिस क्षमता आणि फर्मेंटेशन क्षमता अनुक्रमे 270 केएल आणि 142 केएल आहे. (30 सप्टेंबर 2024 नुसार) हरोहल्ली येथे युनिट 3 चे बांधकाम सुरु आहे. 2025 च्या पहिल्या सहामाहीत ते पूर्णपणे सुरु होईल अशी अपेक्षा आहे.

अँथेमच्या व्यवसायामध्ये सीआरडीएमओ (कॉन्ट्रॅक्ट संशोधन, विकास आणि उत्पादन) सेवा आणि विशेष सामग्रीचे उत्पादन व विक्री यांचा समावेश आहे. न्यू केमिकल एन्टिटी (एनसीई) आणि न्यू बायोलॉजिकल एन्टिटी (एनबीई) लाईफसायकल्समध्ये सर्वसमावेशक, एकीकृत आणि कस्टमाइज करता येईल अशा सीआरडीएमओ सेवांची श्रेणी ही कंपनी प्रस्तुत करते. आरएनएआय, एडीसी, पेप्टाइड्स, लिपिड्स आणि ऑलिगोन्युक्लेओटाइड्स यासारख्या विविध मॉडेलिटीज आणि फ्लो केमिस्ट्री, एंझामॅटिक प्रक्रिया, बायोकॅटलिसिस आणि फर्मेंटेशन यासारखी उत्पादन तंत्रे यामध्ये या कंपनीने आपले मजबूत स्थान निर्माण केले आहे. औषधे विकसित करण्यासाठी तंत्रज्ञान क्षमतांची एक विशाल श्रेणी ही कंपनी प्रस्तुत करते.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये या कंपनीचे संचालनातून मिळणारे उत्पन्न 1056 कोटी रुपये होते जे आर्थिक वर्ष 2024 मध्ये 34.3% नी वाढून 1419 कोटी रुपयांवर पोहोचले. 31 मार्च 2024 रोजी समाप्त झालेल्या वर्षांमध्ये करपश्चात नफा 367 कोटी रुपये नोंदवण्यात आला होता.

या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स जेएम फायनान्शियल लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जे पी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि नोमुरा फायनान्शियल अड्वायजरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे आहेत.

हे इक्विटी समभाग बीएसई आणि एनएसईमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments