जयपूर, 02 January – जयपूर बुकमार्क (जेबीएम) हा भाषांतर आणि हक्कांवर भर देणारा प्रकाशन उद्योगासाठीचा दक्षिण आशियातील एक आघाडीचा प्लॅटफॉर्म म्हणून १२ व्या वर्षात प्रवेश करत आहे. येत्या ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत जयपूर साहित्य महोत्सवासोबत चालणाऱ्या जेबीएममध्ये विविध प्रकारच्या चर्चा होतात. या वेळी त्यात भाषांतराची क्षमता आणि शक्ती या गोष्टी अधोरेखित होतील आणि त्यासोबत ३१ ख्यातनाम प्रकाशकांनी सादर केलेल्या १० भारतीय भाषांमधील ५८ शीर्षकांचा समावेश असलेला दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या सर्वांगीण राइट्स कॅटलॉगचेही प्रदर्शन होईल: प्रकाशन व्यवसायात एआयची भूमिका, गेम्सच्या माध्यमातून कथाकथनाच्या नवीन पद्धती तसेच मुलांच्या पुस्तकांमधील समावेशकता समजून घेणे. उद्योगातील आघाडीचे लोक, लेखक, अनुवादक आणि प्रकाशक आपली मते सांगण्यासाठी व समन्वय साधण्यासाठी केंद्रस्थानी येतील.
जेबीएमने रॉयल नॉर्वेजियन एम्बसीची घोषणा आपला राष्ट्रीय भागीदार म्हणून केली आहे. जागतिक प्रकाशन क्षेत्रात अनुवादाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करताना राजदूत एचई मे-एलिन स्टेनर म्हणआले की, “नॉर्वे हा देश एक दशकापेक्षा अधिक काळापासून म्हणजे जयपूर बुकमार्कच्या स्थापनेपासूनच त्यांचा राष्ट्रीय भागीदार ठरला आहे. या कार्यक्रमाचे संस्थापक भागीदार म्हणून आम्हाला प्रकाशकांचा हा फोरम ज्या प्रकारे विकसित झाला आहे आणि त्याला जयपूर साहित्य महोत्सवाशी जोडण्यात आले आहे हे पाहताना खूप अभिमान वाटतो. जेबीएमने कायमच प्रकाशन उद्योगावर तसेच अनुवाद हा साहित्याचा महत्त्वाचा घटक असल्याच्या बाबीवर भर दिला आहे. आम्ही जेबीएमला खूप शुभेच्छा देतो आणि २०२५ मध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी उत्सुक आहोत.
कार्यक्रमाची वैशिष्टे:
या परिषदेची सुरूवात “ग्रीन शूट्स ऑन बिग आयडियाज” पासून होईल. यात नोबेल साहित्यकार ईस्थर डुफलो यांच्याशी चर्चा केली जाईल. त्या लहान मुलांसाठी अर्थशास्त्राच्या लिखाणाबद्दल बोलतील आणि विचार प्रवर्तक चर्चांसाठी स्टेज खुले होईल.
या वर्षी जेबीएममध्ये तामिळ प्रकाशन व्यवसाय केंद्रबिंदू आहे. यात तामिळ उद्योगातील महान प्रकाशक आणि उगवते तारे सहभागी होतील आणि त्यांनी या उद्योगाचा समृद्ध इतिहास व जागतिक प्रभावावर चर्चा करतील. ख्यातनाम तामिळ विचारवंत ए. आर. व्यंकटचलपती बीजभाषण करतील. त्यानंतर प्रकाशनातील महत्त्वाच्या टप्प्यांचा गौरव करताना “कलाचुवदू टर्न्स ३०” द्वारे कलाचुवदू पब्लिकेशन्सच्या दीर्घकालीन इतिहास आणि जागतिक प्रभावाचा गौरव केला जाईल.
इतर सत्रांमध्ये हार्परकॉलिन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन मूरे यांच्यावरील “स्कॅनिंग दि होरायझन”; “रूट्स अँड विंग्स”, “पुतिया कत्रू: तामिळ प्रकाशनातील ताजी हवा”, “सरावाबाबतचा दृष्टीकोन: संवादातील अनुवादक” या सत्रांमधून जगभरातील प्रकाशन क्षेत्राचा व त्यातील घटकांचा समृद्ध पट उलगडला जाईल. आपण चित्रपटनिर्माते, उद्योजक आणि गेम्सचे निर्माते आनंद गांधी तसेच ख्यातनाम अभिनेता व सहनिर्माते विनय शुक्ला यांच्यासोबत “न्यू मीडिया- न्यू नरेटिव्ह स्फेअर्स” या विषयावर चर्चा करणार आहोत आणि गोष्टी सांगणाऱ्या शासनसारख्या गेम्समधून साहित्याच्या क्षेत्रावरील त्यांच्या प्रभावाबाबत चर्चा करणार आहोत.
“मुलांच्या प्रकाशनातील सर्वसमावेशकता” अशा चर्चांमधून लहान वाचकांसाठी वैविध्यपूर्ण, सहजसाध्य साहित्याच्या निर्मितीबाबत विचारमंथन केले जाईल आणि त्याची परिमाणे समजून घेण्यासाठी या चर्चांचा उपयोग होईल.
इंटरनॅशनल पब्लिशिंग राऊंड टेबल, एडिटर्स राऊंडटेबल आणि रिअल्टर्स राऊंडटेबलद्वारे सर्व व्यावसायिकांना महत्त्वाच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी एकत्र आणले जाईल. हक्क व्यवस्थापकांच्या बदलत्या भूमिकेपासून ते रहस्यकथा प्रकाशन, हिंदी भाषेचे बदलते रूप आणि प्रकाशन व्यवसायाचा ध्यास अशा विविध विषयांवर जेबीएम २०२५ मध्ये चर्चा होईल.
राइट्स कॅटलॉगमधून भारतात आणि जगातही चित्रपट, ओटीटी, ऑडिओबुक्स आणि ईबुक्स अशा विविध प्लॅटफॉर्म्सवर विक्री आणि देवाणघेवाणीच्या क्षमतेवर भर दिला जाईल. प्रत्येक शीर्षकाबाबत तपशील देण्यात आला असून त्यात कव्हर थंबनेल, पुस्तकाचे ब्लर्ब, लेखक/ अनुवादकांची माहिती, पृष्ठ तयार करणे आणि विद्यमान उपलब्ध असलेले हक्क या गोष्टींचा समावेश असून भारतीय साहित्याला जगभरातील वैविध्यपूर्ण बाजारपेठांशी जोडण्यासाठी हा एक महत्त्वाचा स्त्रोत ठरेल.
सहभागींना खालील विविध प्रकारच्या सत्रांचा अनुभव घेता येईल:
• “सरावावर दृष्टीक्षेपः अनुवादकांशी संवाद” – अनुवादाच्या कलेवर दृष्टीक्षेप
• “माझे जग किती वैविध्यपूर्ण आहे? बालसाहित्यातील सर्वसमावेशकता” – बालसाहित्यातील वैविध्यपूर्णतेबद्दल चर्चा.
• “एआय आणि कलात्मकता: बदलते चित्र” – एआयच्या कलात्मकतेवरील प्रभावाबाबत माहिती.
• “वाचनाचे हक्कः सीमारेषांपलीकडे” – साहित्य हक्कांच्या जागतिक देवाणघेवाणीचा अभ्यास
• “रोमांच आणि थरार: रोमांचक साहित्याचे प्रकाशन आणि मार्केटिंग” – गुन्हेगारी कथा प्रकाशनाच्या जगाचा अनुभव.
• “नवीन माध्यमे- कथाकथनाचे नवीन दृष्टीकोन” – कथाकथनावर नवीन माध्यमाच्या प्रभावाचा अभ्यास.
• “पॅशन प्रोजेक्ट्स: प्रेमाने परिपूर्ण पुस्तके” – उत्साह आणि वचनबद्धता यातून निर्माण झालेली पुस्तके.
• “कलात्मक वारसा: लेखक आणि प्रकाशकांचे नाते” – निर्माते आणि प्रकाशक यांच्यामधील खास नात्याचा उलगडा.
• “प्रकाशन उद्योगातील दशदिशाः ब्रिटन आणि भारतातील इंडीज” – ब्रिटन आणि भारतातील स्वतंत्र प्रकाशकांच्या नात्यांवर भर.
परिषद समारोपाकडे जात असताना रिटेलर्स राऊंडटेबल, इंडियन लँग्वेज पब्लिशर्स राऊंडटेबल आणि फेस्टिव्हल डायरेक्टर्स राऊंडटेबलमधून उपस्थितांच्या ज्ञानात तसेच संबंधांमध्ये भर पडेल याची काळजी घेतली जाईल.
लेखिका आणि जयपूर बुकमार्कच्या संचालक नमिता गोखले म्हणाल्या की, “जयपूर बुकमार्कच्या २०२५ च्या आवृत्तीतून प्रकाशन क्षेत्रातील स्थानिक आणि जागतिक संकल्पनांचा विचार करण्यात आला आहे. त्यातून पुस्तकाच्या व्यवसायाबाबत तसेच बदलती तंत्रज्ञाने व नेटवर्क्स या विषयांत एक नवीन दृष्टीकोन मिळतो.”
टीमवर्क आर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक संजय के रॉय म्हणाले की, “जेबीएम हे प्रकाशन उद्योगासाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे. त्यातून या क्षेत्राला आकार देणारी आव्हाने आणि नवसंशोधनांचा विचार केला जातो. या वर्षाचा कार्यक्रम अर्थपूर्ण संवादाला चालना देण्याप्रति, विविध विचारांचा गौरव करणे आणि प्रकाशन वातावरणाच्या उत्क्रांतीला चालना देण्याप्रति आमची वचनबद्धता सिद्ध करतो.”
जयपूर बुकमार्कच्या संचालक मनीषा चौधरी यांनी आपले मत मांडताना सांगितले की, “जेबीएम २०२५ चा विचारपूर्वक तयार केलेला उपक्रम प्रकाशन उद्योगाचे बदलते आणि डायनॅमिक स्वरूप दर्शवतो. बदलते ट्रेंड्स, भारतीय भाषांमधील प्रकाशनाचे वैविध्यपूर्ण जग आणि जगभरातील वातावरणावर तंत्रज्ञानाचा प्रभाव अशा विषयांवरील विविध सत्रांसोबत या वर्षीचा उपक्रम सर्व सहभागींना प्रेरणा देईल आणि त्यांच्या ज्ञानात भर घालेल.”
महान वक्त्यांची भाषणे:
या वर्षीच्या परिषदेत अनेक ख्यातनाम वक्ते जसे ईस्टर डुफलो, ब्रायन मुरे, आनंद गांधी, कन्नन सुंदरम, नोरा मर्कुरिओ, मेरू गोखले, अशोक महेश्वरी, जॉन पीडरसन, रॉजर हायफिल्ड आणि टिफनी गसोक तसेच इतर अनेक वक्ते सहभागी होतील.
नावनोंदणी सुरू आहे:
जयपूर बुकमार्क २०२५ मध्ये प्रकाशन व्यावसायिक, लेखक आणि साहित्यकारांचे या चर्चा, अध्ययन आणि सहयोगाच्या खास स्वरूपात सहभागी होण्यासाठी स्वागत आहे. कार्यक्रमाच्या तसेच नोंदणीच्या संपूर्ण तपशिलांसाठी जेबीएमच्या अधिकृत वेबसाइटला (https://jaipurbookmark.org/) भेट द्या. जयपूर बुकमार्क २०२५ मध्ये प्रकाशनाच्या अत्यंत सुंदर आणि वैविध्यपूर्ण जगाला भेट देण्याची अद्वितीय संधी चुकवू नका.
प्रसारमाध्यम नोंदणी सुरू झाली आहे. प्रसारमाध्यमांनी लवकरात लवकर नोंदणी करावी अशी आम्ही आपल्याला विनंती करतो जेणेकरून आपल्या नोंदणीवर आम्हाला प्रक्रिया सुरू करता येईल: https://media.jaipurliteraturefestival.org/
जयपूर बुकमार्क २०२५: दक्षिण आशियातील प्रतिष्ठित प्रकाशन समूह अद्वितीय कार्यक्रमांसह आपल्या भेटीला
RELATED ARTICLES


