पुणे,12 डिसेंबर 2023 : दीनदयाळ पोर्ट ऑथॉरिटी (डीपीए) आणि फिक्की तर्फे मुंबईमध्ये नुकतेच सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) प्रकल्प पुर्नरचनेबाबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डीपीएचे अध्यक्ष एस.के.मेहता,उपाध्यक्ष नंदिश शुक्ला,त्याचबरोबर मुख्य अभियंता व्ही.रविंद्र रेड्डी,एफए आणि सीएओ बी.भाग्यनाथ,वरिष्ठ उप वाहतूक व्यवस्थापक सुदिप्ता बॅनर्जी आणि डीपीएचे इतर अधिकारी उपस्थित होते.
या परिसंवादा दरम्यान आगामी सार्वजनिक-खाजगी भागीदारी प्रकल्पांबाबत दीनदयाळ पोर्ट ऑथॉरिटीने सादरीकरण करत माहिती दिली.यामध्ये ओल्डकांडला येथील तीन ऑईल जेट्टी आणि टुना टेकरा येथील बहुउद्देशीय ड्राय कार्गो सुविधेवर प्रकाश टाकला.आर्थिक वाढ आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी प्राधिकरणाच्या समर्पणावर भर देऊन या प्रकल्पांमधील धोरणात्मक दृष्टी आणि उद्दिष्ट यांसंबंधी या सादरीकरणामध्ये भर देण्यात आला.
या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींसह विविध भागधारकांनी सक्रीय सहभाग घेतला. या चर्चासत्रामुळे रचनात्मक संवादासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ज्यामध्ये भागधारकांनी प्रकल्पांच्या यशस्वी अमंलबजावणीकरिता आपल्या बहुमोल सूचना दिल्या व नाविन्यपूर्ण कल्पना सादर केल्या. भागधारकांनी नियोजन आणि विकासप्रक्रियेत सहभागी करून घेण्याच्या डीपीएच्या पुढाकाराचे कौतुक केले.भागधारकांकडून मिळालेल्या सूचना व अभिप्राय याचा काळजीपूर्वक विचार करून अंतिम प्रकल्प प्रस्तावांमध्ये समाविष्ट केले जातील.
याप्रसंगी दीनदयाळ पोर्ट ऑथॉरिटीचे अध्यक्ष संजय मेहता म्हणाले की, पीपीपी प्रकल्पांची रचना ही दीर्घकालीन यशाची खात्री करण्यासाठी आणि बंदराच्या वाढीस हातभार लावण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल आहे.आमचा विश्वास आहे की,या प्रयत्नांमध्ये भागधारकांचा सहभाग हा महत्त्वाचा आहे आणि आज मिळालेला रचनात्मक अभिप्राय आणि सूचनांसाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो.आम्ही या सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करू आणि सर्व भागधारकांना फायदा होईल अशा प्रकारे प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू.
दीनदयाळ बंदर प्राधिकरण सर्व उपस्थितांचे, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही, त्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल आणि संवादात अर्थपूर्ण योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. प्राधिकरण पारदर्शकता, सर्वसमावेशकता आणि सहकार्यासाठी वचनबद्ध आहे कारण ते पीपीपी प्रकल्पांच्या पुनर्रचनेसह पुढे जात आहे, ज्यामुळे प्रदेशाच्या आर्थिक समृद्धीमध्ये योगदान आहे.