Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedराम प्रेरणा रॅलीत तब्बल ४०० भाविकांचा सहभाग एकल युवा पुणे चॅप्टर, एमआयजी,...

राम प्रेरणा रॅलीत तब्बल ४०० भाविकांचा सहभाग एकल युवा पुणे चॅप्टर, एमआयजी, एमपीएफ पुणे वेस्ट यांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन

पुणे : एकल युवा पुणे चॅप्टरच्या वतीने उत्कट भक्ती आणि एकात्मतेने भारलेल्या वातावरणात जय श्रीराम चा जयघोष करीत तब्बल ४०० राम भक्तांनी राम प्रेरणा रॅलीत सहभाग घेतला. अयोध्या राम मंदिराच्या ऐतिहासिक उद्घाटनाच्या निमित्ताने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

 

पुणे एकल चॅप्टरचे अध्यक्ष दिनेश मुंदडा आणि कार्यक्रम व्यवस्थापक पवन नावंधर यांच्या नेतृत्वाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वसंत राठी, मनोज बेहेडे, अर्चना बेहेडे, अंजली तापडिया या रॅलीत सहभागी झाले होते.

 

बाणेर येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली. ३ किलोमीटरचा प्रवास करून बाणेरमधील हनुमान मंदिरापर्यंत रॅली पोहोचली. या मिरवणुकीत लहान मुले राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाच्या वेशात सहभागी झाले होते. देवी देवतांच्या आकृती असलेला रथ साकारण्यात आला होता.

 

एकल युवा पुणे चॅप्टरने एमआयजी, एमपीएफ पुणे वेस्ट, औंध माहेश्वरी महिला मंडळ, बाणेर बालेवाडी महिला मंडळ आणि विदर्भ माहेश्वरी मंडळासह विविध संस्थांच्या सहकार्याने भव्य रॅली संपन्न झाली. राम अयोध्या मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा साजरा करणे आणि भक्तांमध्ये एकता वाढवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

 

एकल युवा ची स्थापना १९८९ मध्ये कोलकाता येथे मुख्यालयासह स्थापन झाली. एकल देशभरात अंदाजे ८० हजार शाळा चालवते. या शाळा दुर्गम खेड्यांमध्ये कार्यरत आहे

त.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments