पुणे, ता. २३ : पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्रातर्फे जन आरोग्य हितार्थ विविध उपक्रम सातत्याने रावबिले जातात याच अनुषंगाने महिला आणि बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या प्रमुख उद्देशाने गर्भाशय मुखाचा कर्करोगाच्या (सार्विकल कॅन्सर) जागरूकता वाढविण्याच्या दृष्टीने मोफत पॅप स्मीअर तपासणी आणि बालकांमधील जन्मजात दोषांबाबत विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
‘मोफत पॅप स्मीअर तपासणी ‘ उपक्रमाचा उद्देश महिलांची गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी मोफत तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाय, कर्करोगाचे निदान व उपचार तसेच त्यासंदर्भातील विविध अडथळे दूर करणे या हेतून समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले
यासोबतच संस्थेतर्फे बालरोग विभागामध्ये विशेष जनजागृती सत्र घेण्यात आले . राष्ट्रीय स्तरावर आढळणारे बालकांमधील जन्मजात दोष टाळण्यासाठी आणि जन्मापूर्वी घ्यावयाची काळजी व उपचार करण्याबाबत मार्गदर्शन केले. या सत्रांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरानी माहिती दिली आणि रूग्णांशी थेट संवाद साधत पालकांना सजग करण्याचा प्रयत्न केला तसेच या शिबिरांमधून निरोगी बालकांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण होईल यासाठी जनजागृती करण्यात आली.
संस्थेतील बालरोग विभागाच्या प्रमुख,डॉ. शैलजा माने म्हणाल्या, ” बालकांमधील जन्मजात दोष ही एक गंभीर चिंतेची बाब आहे आणि आपल्या मुलांचे आरोग्य सांभाळण्यासाठी जागरूकता ही एक उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. यासाठी पालकांनी जागरुकता असणे गरजेचे आहे. आम्ही पालकांना योग्य निदान चाचण्या, वेळीच तपासण्या, उपचार याबाबत सक्षम करण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती देत असतो. त्यांच्यामध्ये जागरुकता वाढविण्याचे आमचे प्रमुख ध्येय आहे.”
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबतच्या जागरूकतेबद्दल, संस्थेतील वरिष्ठ प्राध्यापक, डॉ. स्वाती दत्तात्रय भाकरे म्हणाल्या, “गर्भाशयाचा कर्करोग टाळता येण्याजोगा आहे. यासाठी जलद निदान आवश्यक असून, त्याकरिता नियमित तपासणी अत्यावश्यक आहे. आम्ही मोफत पॅप स्मीअर तपासणी सत्र हे सर्व महिलांसाठी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले असून या उपक्रमात आरोग्य व्यवस्थापनाचा सक्रिय सहभाग असतो तसेच सर्वसमावेशक आरोग्य सेवा देत निरोगी समुदायासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.


