राष्ट्रीय, २३ जानेवारी २०२४: भारतात आध्यात्मिक पर्यटनाच्या वाढत्या विकासादरम्यान क्लीअरट्रिप या फ्लिपकार्ट कंपनीने ‘दर्शन डेस्टिनेशन्स’च्या लाँचची घोषणा केली आहे. अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापनेनंतर पर्यटन क्षेत्रामधील अनपेक्षित वाढ आणि मंदिराला भेट देणारे मान्यवर व सेलिब्रिटींची वाढती संख्या पाहता क्लीअरट्रिप प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद घेण्यासाठी भक्तांना मदतीचा हात पुढे करत आहे, जेथे अयोध्याला भेट देण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना १००८ कॉम्प्लीमेण्टरी फ्लाइल तिकिटे देण्यात येत आहेत. ही ऑफर फ्लिपकार्ट ट्रॅव्हल व्यासपीठांवर देखील उपलब्ध असेल.
‘दर्शन डेस्टिनेशन्स’ अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून क्लीअरट्रिप आणि फ्लिपकार्ट ट्रॅव्हल विविध धार्मिक गंतव्यांसाठी फ्लाइट्स*, हॉटेल्स व बसेसवर स्पेशल भाडे देखील लाँच करत आहेत. पर्यटक अयोध्या, मदुराई, तिरूपती, अमृतसर, भोपाळ, शिर्डी, बोधगया, कोची, कात्रा (जम्मू) अशा भारतातील पवित्र आध्यात्मिक गंतव्यांसाठी बस, हॉटेल व फ्लाइट बुकिंग्जवर २० टक्के सूटचा आनंद घेऊ शकतात. हा उपक्रम भक्तांना फ्लाइट्स, हॉटेल्स व बसेसवर सवलतीचे दर देण्यासाठी सर्वसमावेशक तत्त्व असेल.
अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापनेसह आध्यात्मिक पर्यटनामध्ये होणाऱ्या वाढीमधून पर्यटकांच्या पसंतींमधील मोठे परिवर्तन दिसून येते. क्लीअरट्रिप आणि फ्लिपकार्ट ट्रॅव्हलने व्यासपीठावर अयोध्येसाठी शोधांमध्ये एकूण १५०० टक्के वाढीची नोंद केली आहे.
याबाबत मत व्यक्त करत क्लीअरट्रिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अय्यप्पन राजगोपाल म्हणाले, ”ग्राहक-केंद्रित कंपनी क्लीअरट्रिप वापरकर्त्यांच्या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करते. आम्हाला माहित आहे की आध्यात्मिक प्रवास आपल्या संस्कृतीमधील महत्त्वाचा भाग आहे, ज्यामधून शतकांपासून सुरू असलेल्या परंपरा दिसून येतात. अधिकाधिक भक्त या अर्थपूर्ण प्रवासावर जाण्यास उत्सुक असताना आमची हे अनुभव अधिक उपलब्ध होण्याजोगे आणि किफायतशीर करण्याची इच्छा होती. आम्हाला अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापनेसह या ऑफरिंगची सुरूवात करण्याचा आनंद होत आहे. विशेषत: देशाच्या संपन्न वारसामध्ये तल्लीन होण्याची इच्छा असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी डिझाइन करण्यात आलेल्या आमच्या ऑफरिंगमधून ग्राहकांच्या विविध गरजांची पूर्तता करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आम्ही इतर व्यक्तींना डिवाईन डेस्टिनेशन्सचा अनुभव घेण्यासाठी आणि सहजपणे त्यांच्या पर्यटन आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी प्रेरित व सक्षम करण्याची आशा करतो.”
दर्शन डेस्टिनेशन्स सारख्या ग्राहक-केंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून क्लीअरट्रिप आणि फ्लिपकार्ट ट्रॅव्हल किफायतशीरपणा, उपलब्धता आणि सीमेपलीकडील वापरकर्त्यांना पाहिजे असलेला उच्च दर्जाचा प्रवास अनुभव देत राहिल.
*क्लीअरट्रिप: वर उल्लेख करण्यात आलेल्या गंतव्यांसाठी देशांतर्गत फ्लाइट्सवर २० टक्क्यांची सूट फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, जी ज्येष्ठ नागरिक सवलतीच्या भाड्यांपेक्षा जास्त आहे. वर उल्लेख करण्यात आलेल्या गंतव्यांसाठी हॉटेल्स व बसेसवर २० टक्क्यांची सूट सर्व पर्यटकांसाठी आहे.
फ्लिपकार्ट ट्रॅव्हल: वर उल्लेख केलेल्या गंतव्यांसाठी सर्व देशांतर्गत फ्लाइट्स व हॉटेल्सवर २० टक्के सूट सर्व वापरकर्त्यांसाठी आहे (फक्त मर्यादित यादी)
.


