Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedयशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक*

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक*

 

 

पुणे, दि. २३ : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी २४.२५०. येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत २४ जानेवारी रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे. या कालावधीत पुण्याकडे जाणारी सर्व सर्व प्रकारची वाहने (हलकी तसेच जड-अवजड वाहने) यांची वाहतूक बंद राहील.

 

 

वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने शेडुंग फाटा कि.मी ८.२०० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना मुंबई-पुणे महामार्गावरुन शिंग्रोबा घाटातुन मॅजिक पॉईंट कि.मी ४२.००० येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments