Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedडी. ई. एस. प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला विश्वविक्रम 1200 विद्यार्थ्यांनी सादर...

डी. ई. एस. प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला विश्वविक्रम 1200 विद्यार्थ्यांनी सादर केली योगाची प्रात्यक्षिके

डी. ई. एस. प्रायमरी स्कूलच्या 1200 विद्यार्थ्यांनी दीड तासात प्राचीन ते आधुनिक काळापर्यंतचे 30 प्रकारचे योगा प्रकार सादर करून इंडिया वर्ल्ड बुकमध्ये नोंद करीत विश्वविक्रमाला गवसणी घातली.

डी. ई. एस. च्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, कार्यवाह डॉ. आनंद काटिकर, डॉ. शरद कुंटे, प्रा. धनंजय कुलकर्णी, ॲड. राजश्री ठकार, खेमराज रणपिसे, मुख्याध्यापिका अर्चना धनावडे, डॉ. पल्लवी गव्हाणे, डॉ. सोपान कांगणे, विकी बारावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सूर्यनमस्कार, चंद्रनमस्कार, ट्रायबल योगा, ॲनिमल योगा, बर्ड पोजेस, दंड योगा, पार्टनर योगा, रिव्होल्यूशनरी पोजेस, ताली योगा, ऱ्हिदमिक योगा, इक्विमेंट योगा, थेरा बँड योगा, ब्रिक्स योगा, चेअर योगा, मेडिसनल बाॅल योगा, योगा फाॅर स्पोर्ट्स, डान्स योगा, पॅट्रियाॅटिक मंडल योगा, ॲक्वा योगा, स्पिरिच्युअल योगा आणि पावर योगा असे प्रकार सादर केले. ढोलताशा पथकाचे पालकांनी संचलन केले.

मुख्याध्यापिका अर्चना धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिमरन गुजर, ग्रेसी डिसूझा, क्रीडा शिक्षिका योगिनी कानडे, मिलिंद संपगावकर यांनी संयोजन केले.
..

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments