Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ...

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे दि. 20: वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मुख्य कंपनी) पुणे या कार्यालयामार्फत एक लाख रुपये थेट कर्ज योजना राबविण्यात येत असून लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, एक लाख थेट कर्ज योजनेमध्ये संपूर्ण कर्ज महामंडळाकडून दिले जाणार आहे. २ हजार ८५ रुपयांच्या नियमित ४८ समान मासिक हप्त्यामध्ये परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु, थकीत हप्त्यावर द.सा.द.शे. ४ टक्के व्याजदर आकारण्यात येईल.

अधिक माहितीसाठी महामंडळाचे पुणे जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी. विंग, तळ मजला, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, आळंदी रोड, सर्व्हे नं.१०५, १०६, पुणे, दूरध्वनी क्र. ०२०- २९७०३०४९ येथे संपर्क करावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक किरण गिऱ्हे यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments