वडगाव, २१ जानेवारी २०२५ : कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर लिमिटेड सोल्यूशन्स या भारतातील प्रमुख इलेक्ट्रिक दुचाकी व तीन चाकी उत्पादक कंपनीने पुणे जिल्ह्यातील वडगाव येथे नवीन इलेक्ट्रिक दुचाकी डिलरशिपच्या उद्घाटनाची घोषणा केली.. हे भव्य उद्घाटन महाराष्ट्र राज्यामध्ये आपली उपस्थिती वाढवण्याप्रती ब्रँडच्या कटिबद्धतेमधील महत्त्वाचा टप्पा आहे.
वडगावमधील कायनेटिक ग्रीनची नवीन डिलरशिप ३एस फॅसिलिटी (सेल्स-सर्विस-स्पेअर्स) आहे. ही डिलरशिप कायनेटिक ग्रीनच्या इलेक्ट्रिक दुचाकी ई-लुना, झुलू, झिंग या वैविध्यपूर्ण श्रेणी प्रदर्शित करते. ज्या भारतातील ग्राहकांच्या विशिष्ट गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत. या मॉडेल्समध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह शाश्वततेचे उत्तम संयोजन आहे, जे सर्वोत्तम वैशिष्ट्ये म्हणून स्मार्ट, शार्प व स्लीक डिझाइन्ससह सुसज्ज आहेत.
‘साई ऑटोमोबाइल्स ग्रीन’ या डीलरशिपचे उद्घाटन आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भास्करराव म्हाळसकर (भाजपचे कार्यवाहक नेते), श्री. चंद्रशेखर भोसले (जि.प. सदस्य), श्री. मयूर ढोरे (नगराध्यक्ष – वडगाव), श्री. पंढरीनाथ ढोरे (ग्रामपंचायत अध्यक्ष), श्री. राजेंद्र कुडे (नगरसेवक), श्री. किरण म्हाळसकर (नगरसेवक), श्री. संभाजी म्हाळसकर (अध्यक्ष, भाजप – वडगाव), श्री. सुनिल ढोरे (नगरसेवक), श्री. किरण भिलारे (पोटोबा मंदिराचे अधिकृत प्रतिनिधी), श्री. बाबाजी गायकवाड (उपाध्यक्ष, ग्रामपंचायत – टाकवे मावळ), श्री. प्रवीण चव्हाण (नगरसेवक) आणि श्री. नितीन वसंतराव कुडे (ग्रामपंचायत अध्यक्ष) आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच, उद्योगपती श्री. आकाश कुडे, श्री. प्रवीण वसंतराव कुडे आणि श्री. सतीश डोंगरे यांच्यासह कायनेटिक ग्रीनचे श्री. निलेश पवार हे देखील उपस्थित होते. त्यांनी हवामान बदल आणि प्रदूषणाला तोंड देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) किती महत्त्वाची भूमिका बजावतात यावर चर्चा केली.
डिलरशिप विस्तारीकरणाबाबत मत व्यक्त करत कायनेटिक ग्रीनच्या दुचाकी व्यवसायाचे अध्यक्ष श्री. पंकज शर्मा म्हणाले, ”आम्हाला वडगावमध्ये आमच्या नवीन डिलरशिपच्या उद्घाटनाची घोषणा करताना आनंद होत आहे, जे महाराष्ट्रातील आमची उपस्थिती वाढवण्यामधील प्रमुख पाऊल आहे. या टप्प्यामधून भारतभरात इलेक्ट्रिक गतीशीलता उपलब्ध होण्याजोगी व मुख्य प्रवाहात आणण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आमचे समर्पित शोरूम टीम तज्ञ मार्गदर्शनासह ग्राहकांना साह्य करतील, ज्यामधून त्यांना विनासायास खरेदी अनुभव, सर्विस सपोर्टची खात्री मिळेल, तसेच ग्राहक त्यांच्या खरेदीसंदर्भात योग्य निर्णय घेण्यास सक्षम होतील.”
याबाबत मत व्यक्त करत ‘साई ऑटोमोबाइल्स ग्रीन’चे प्रोप्रायटर श्री. मुरलीधर रेड्डी म्हणाले, ”आम्हाला कायनेटिक ग्रीनसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे आणि त्यांनी आम्हाला दिलेल्या पाठिंबा, तसेच दाखवलेल्या आत्मविश्वासासाठी त्यांचे आभार मानतो. आमचा ग्राहकांना उच्च-स्तरीय सेवा व तज्ञ मार्गदर्शन देण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे त्यांना योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. तसेच जागतिक दर्जाचा सर्विस अनुभव मिळेल. ईव्ही बाजारपेठेच्या झपाट्याने होत असलेल्या विकासासह मला विश्वास आहे की, ही डिलरशिप वडगावमध्ये आणि मावळच्या आसपासच्या भागांमध्ये पर्यावरणपूरक परिवहन सोल्यूशन्सला चालना देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.”


