Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedअसेट मिक्समधील वैविध्‍यतेत वाढ; सुरक्षित उत्‍पादनांचे प्रबळ योगदान; आर्थिक वर्ष २५ च्‍या...

असेट मिक्समधील वैविध्‍यतेत वाढ; सुरक्षित उत्‍पादनांचे प्रबळ योगदान; आर्थिक वर्ष २५ च्‍या नऊमाहीमध्‍ये एनआयएम ९.० टक्‍के

निव्‍वळ लोन बुक वार्षिक १० टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ३०,४६६ कोटी रूपयांवर पोहोचले;
सुरक्षित खातेपुस्‍तक सप्‍टेंबर २०२४ मधील ३५ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्‍ये ३९ टक्‍के;
जीएनपीए / एनएनपीए तिमाहीसाठी अनुक्रमे २.७ टक्‍के / ०.६ टक्‍के; पीसीआर ८० टक्‍के
ठेवी ३४,४९४ कोटी रूपये, वार्षिक १६ टक्‍के वाढ; सीएएसएमध्‍ये वार्षिक १५ टक्‍के वाढ; सीएएसए रेशिओमध्‍ये २५ टक्‍के वाढ
बेंगळुरू, गुरूवार, २३ जानेवारी २०२५: उज्‍जीवन स्‍मॉल फायनान्‍स बँक लि. [बीएसई: ५४२९०४; एनएसई: उज्जीवनएसएफबी]ने आज डिसेंबर २०२४ रोजी समाप्‍त झालेल्‍या तिमाहीसाठी आपल्या आर्थिक कामगिरीची घोषणा केली.
उज्जीवन स्‍मॉल फायनान्‍स बँकेच्‍या व्‍यवसाय कामगिरीचा सारांश – आर्थिक वर्ष २५ ची तिसरी तिमाही
मालमत्ता
निव्‍वळ लोन बुक वार्षिक ९.८ टक्‍क्‍यांच्‍या / तिमाही-ते-तिमाही ०.४ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह ३०,४६६ कोटी रूपयांवर पोहोचले.
सुरक्षित खातेपुस्‍तक डिसेंबर २०२३ मधील २८.३ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्‍ये ३९.३ टक्‍के / सप्‍टेंबर २०२४ मध्‍ये ३४.९ टक्‍के होते.
सुरक्षित खातेपुस्‍तकमध्‍ये तिमाही-ते-तिमाही १३.३ टक्‍के आणि वार्षिक ५२.० टक्‍के वाढ.
वसुली आणि मालमत्ता दर्जा
डिसेंबर २०२४ मध्ये जवळपास ९६ टक्‍के क्षमतेसह वसुलीमध्‍ये वाढ;
समूह व वैयक्तिक कर्ज खातेपुस्तिकासाठी बकेट X संकलन क्षमतेमध्‍ये सुधारणा; डिसेंबर २०२४ पर्यंत ९९.३ अकके.
धोका पत्करणारे पोर्टफोलिओ* / जीएनपीए* / एनएनपीए* डिसेंबर २०२४ मध्‍ये अनुक्रमे ५.४ टक्‍के / २.७ टक्‍के / ०.६ टक्‍के; सप्‍टेंबर २०२४ मध्‍ये अनुक्रमे ५.१ टक्‍के / २.५ टक्‍के / ०.६ टक्‍के; आर्थिक वर्ष २५ च्‍या तिसऱ्या तिमाहीमध्‍ये ३० कोटी रूपयांचे राइट-ऑफ;
तिसऱ्या तिमाहीमध्ये त्‍वरित तरतूद घेण्‍यात आली; डिसेंबर २०२४ मध्‍ये प्रोव्‍हीजन कव्‍हरेज रेशिओ ८० टक्‍के#
ठेवी
ठेवी डिसेंबर २०२४ मध्‍ये वार्षिक १६.३ टक्‍के / तिमाही-ते-तिमाही १.२ टक्‍के वाढीसह ३४,४९४ कोटी रूपये.
सीएएसए ८,६६२ कोटी रूपये, वार्षिक १५२६ टक्‍के वाढ; सीएएसए रेशिओ डिसेंबर २०२४ मध्‍ये २५.१ टक्‍के होते.
रिटेल टीडी^ वाढत राहिले आणि डिसेंबर २०२४ मध्‍ये १६,६१२ कोटी रूपये होते, ज्‍यामध्‍ये वार्षिक २९.५ टक्‍के / तिमाही-ते-तिमाही ४.४ टक्‍के वाढ झाली.
वित्तीय
आर्थिक वर्ष २५ च्‍या तिसऱ्या तिमाहीत एनआयआय वार्षिक ३.१ वाढीसह ८८७ कोटी रूपयांवर पोहोचले; आर्थिक वर्ष २५ च्‍या तिसऱ्या तिमाहीत एनआयएम ८.६ टक्‍के होते.
सरासरी मालमत्तांचा ओपेक्‍स आर्थिक वर्ष २५ च्‍या दुसऱ्या तिमाहीमधील ६.४ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत आर्थिक वर्ष २५ च्‍या तिसऱ्या तिमाहीत ६.२ टक्‍के होते.
आर्थिक वर्ष २५ च्‍या तिसऱ्या तिमाहीत पीपीओपी ३५९ कोटी रूपये होते; आर्थिक वर्ष २५ च्‍या तिसऱ्या तिमाहीत समायोजित$ पीएटी (करोत्तर नफा) १३२ कोटी रूपये होता.
आर्थिक वर्ष २५ च्‍या तिसऱ्या तिमाहीत समायोजित$ आरओए / आरओई अनुक्रमे १.२ टक्‍के / ८.८ टक्‍के होते.
भांडवल आणि रोखीकरण
भांडवल पूर्तता प्रमाण २३.९ टक्‍के.
डिसेंबर २०२४ साठी प्रोव्‍हीजनल डेअली अॅव्‍हरेज एलसीआर १३०.४ टक्‍के होता.
* डिसेंबर २०२४/ सप्‍टेंबर २०२४ / डिसेंबर २०२३ नुसार १९९ कोटी रूपये / ५७९ कोटी रूपये/ १,५९६ कोटी रूपयांच्या आयबीपीसी आणि सिक्युरटायझेशनच्या समायोजनाशिवाय.
^ रिटेल टीडीएस म्हणजे ३ कोटी रूपयांपेक्षा कमी टीडीएस
# २५० कोटी रूपयांची फ्लोटिंग तरतूद ही खातेपुस्तकांवर कायम राहील आणि तिचा वापर आरबीआयच्या परवानगीने अत्यंत कठीण परिस्थितीत भविष्यातील विशिष्ट तरतुदींसाठी केला जाईल. यापैकी जून २२ मध्ये ३० कोटी रूपये टियर २ भांडवलासाठी देण्यात आले आणि १७० कोटी रूपये पीसीआर गणनसाठी राखून ठेवण्‍यात आले आहेत.
$ त्‍वरित तरतूदीसाठी ३० कोटी रूपये समायोजित करण्‍यात आले.
उज्‍जीवन स्‍मॉल फायनान्‍स बँकेचे व्‍यवस्‍थापकीय संचालक (एमडी) व मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. संजीव नौटियाल म्‍हणाले, “आर्थिक वर्ष २५ ची तिसरी तिमाही उत्तम तिमाही ठरली आहे, जेथे कर्ज खातेपुस्तिकाच्‍या वैविध्‍यीकरणामध्‍ये सतत सुधारणा दिसून येत आहे. अधिक सुरक्षित खातेपुस्तिकाप्रती आमच्‍या धोरणाने निष्‍पत्तींना गती दिली आहे, जेथे एकूण मालमत्ता कर्जामध्‍ये ३९ टक्‍क्‍यांचे योगदान दिले आहे, ज्‍यामध्‍ये तिमाही-ते-तिमाही १३ टक्‍के आणि वार्षिक ५२ टक्‍के वाढ झाली. या प्रयत्‍नांमुळे कर्ज खातेपुस्तिका तिमाही-ते-तिमाही ०.४ टक्‍के आणि वार्षिक १० टक्‍के वाढीसह ३०,४६६ कोटी रूपयांपर्यंत पोहोचली.
जबाबदार धनको म्‍हणून बँकेने ग्रुप लोन्‍स (जीएल) आणि इंडिव्हिज्‍युअल लोन्‍स (आयएल) मधील व्‍याजदर कमी करण्‍यासाठी सक्रिय निर्णय घेतला, जेथे १ जानेवारी २०२५ पासून ग्राहकांसाठी स्‍पर्धात्‍मक दर सादर करण्‍यात आले. यामुळे दर्जेदार ग्राहक संपादित करता येतील. यासोबत, आम्‍ही विकसित होत असलेल्‍या मायक्रोफायनान्‍स क्षेत्रावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि त्‍यामधून योग्‍यरित्‍या नेव्हिगेट करत आहोत. सुरूवातीला दिसण्‍यात आलेल्‍या मंदीच्‍या वातावरणानंतर आता उत्तम ट्रेण्‍ड्स दिसून येत आहेत. जीएल व आयएलमधील एक्‍स-बकेट संकलन क्षमता ऑगस्‍ट २०२४ मधील ३९.० टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्‍ये ९९.३ टक्‍क्‍यांपर्यंत सुधारली आहे. उत्तम स्थितीमुळे आम्‍हाला आर्थिक वर्ष २५ च्‍या चौथ्‍या तिमाहीच्‍या पहिल्‍या ३ आठवड्यांदरम्‍यान उच्‍च वितरण दिसण्‍यात आले आहे. विविध राज्‍यांमध्‍ये स्थिती सुरळीत होत असताना आम्‍ही उत्तम व्‍यवसाय वाढीसाठी सज्‍ज आहोत. सुरक्षित व्‍यवसाय सतत व निश्‍चयी प्रगती करत आहेत, यंदा जवळपास ४० टक्‍के वायटीडी वाढीची नोंद केली आहे आणि संपूर्ण आर्थिक वर्ष २५ साठी प्रबळ वाढीची नोंद करण्‍यास सज्‍ज आहे.
मालमत्ता दर्जाचे उत्तमरित्‍या व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी बँकेने २७० कोटी रूपयांच्‍या तणावपूर्ण कर्ज मालमत्तांची विक्री देखील केली आहे. बँकेने भविष्‍यातील कोणत्‍याही आपत्‍कालीन स्थितीत सुरक्षित राहण्‍यासाठी ३० कोटी रूपयांची त्‍वरित तरतूद देखील केली आहे. ज्‍यानंतर जीएनपीए / एनएनपीए डिसेंबर २०२४ मध्‍ये अनुक्रमे २.७ टक्‍के / ०.६ टक्‍के होते, तसेच पीसीआर ८० टक्‍के होते.
ठेवी पुस्तिका डिसेंबर २०२४ मध्‍ये ३४,४९४ कोटी रूपये होती, ज्‍यामध्‍ये तिमाही-ते-तिमाही १.२ टक्‍के आणि वार्षिक १६.३ टक्‍के वाढ झाली. डिसेंबर २०२४ मध्‍ये सीएएसए प्रमाण २५.१ टक्‍के होते, जे उत्तम राहिले. बँक आपल्‍या दायीत्‍व धोरणामध्‍ये काही संरचनात्‍मक बदल करण्‍याच्‍या प्रक्रियेत आहे, जेथे मोठ्या प्रमाणात नॉन-रेसिडण्‍ट्स, कॉर्पोरेट सॅलरी आणि ट्रेडर्स अंतर्गत वर्गीकृत करण्‍यात आलेल्‍या श्रीमंत ग्राहकांच्‍या अधिक लक्ष्य विभागांना सेवा देण्‍यावर फोकस वाढवत आहे. एडी-१ परवाना मिळाल्‍यानंतर आमच्‍या प्रॉडक्‍ट सूटमधील नवीन उत्‍पादने देखील ऑफरिंग्‍ज वाढवतील आणि आमच्‍या वरील धोरणानुसार ग्राहकवर्गामध्‍ये सुधारणा करतील.
शेवटचे म्‍हणजे, मला सांगताना आनंद होत आहे की आज झालेल्‍या बैठकीत मंडळाची मंजूरी मिळाल्‍यानंतर आम्‍ही लवकरच युनिव्‍हर्सल बँकेत रूपांतरित होण्‍यासाठी आरबीआयकडे अर्ज पाठवणार आहोत.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments