बेंगळुरू, भारत – जानेवारी २३, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज घोषणा केली की, ग्राहक त्यांचे नवीन गॅलॅक्सी एस२५ अल्ट्रा, गॅलॅक्सी एस२५+ आणि गॅलॅक्सी एस२५ स्मार्टफोन्स प्री-ऑर्डर करू शकतात. हे स्मार्टफोन्स आतापर्यंतच्या सॅमसंगच्या सर्वात नैसर्गिक व संदर्भ-केंद्रित मोबाइल अनुभवांसह खरे एआय सोबती म्हणून नवीन मापदंड स्थापित करतात.
गॅलॅक्सी एस२५ सिरीज एआय एजंट्स आणि मल्टीमोडल क्षमतांना एकीकृत करत प्रत्येक टचपॉइण्टवर वापरकर्त्यांच्या परस्परसंवाद साधण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्याच्या सॅमसंगच्या दृष्टिकोनाच्या दिशेने पहिले पाऊल आहे. गॅलॅक्सी चिपसेटसाठी अद्वितीय कस्टमाइज्ड स्नॅपड्रॅगन® ८ एलाइट मोबाइल प्लॅटफॉर्म गॅलॅक्सी एआयसाठी उत्तम ऑन-डिवाईस प्रोसेसिंग पॉवर आणि गॅलॅक्सीच्या नेक्स्ट-जनरेशन प्रोव्हिज्युअल इंजिनसह उच्च दर्जाची कॅमेरा रेंज व कंट्रोल देते.
“सॅमसंगने गेल्या वर्षी गॅलॅक्सी एआयच्या लाँचसह मोबाइल एआयच्या युगाचे अनावरण केले. आम्ही आता गॅलक्सी एस२५ सिरीजसह गॅलॅक्सी एआयच्या पुढील चॅप्टरला सुरूवात करत आहोत. गॅलॅक्सी एस२५ सिरीज तुमची खरी एआय सोबती आहे. गॅलॅक्सी एस२५ सिरीज तुम्हाला सर्वात संदर्भ-केंद्रित, वैयक्तिकृत एआय देते, ज्यामुळे तुम्हाला खात्रीदायी वैयक्तिक गोपनीयतेसह सर्वोत्तम, कृतीशील माहिती मिळू शकते. मला सांगताना आनंद होत आहे की, नवीन गॅलॅक्सी एस२५ सिरीज आमच्या नोएडामधील फॅक्टरीमध्ये उत्पादित करण्यात येईल,” असे सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जेबी पार्क म्हणाले.
गॅलॅक्सी एस२५ सिरीजमधील स्मार्टफोन्समध्ये वन यूआय ७ सॅमसंगचा एआय-फर्स्ट प्लॅटफॉर्म आहे, जो सर्वोत्तम कंट्रोल्स देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. यामुळे एआय-पॉवर्ड वैयक्तिकृत मोबाइल अनुभव मिळतात. एआय एजंट्ससह मल्टीमोडल क्षमता गॅलॅक्सी एस२५ ला परस्परसंवादांसाठी मजकूर, स्पीच, इमेजेस् व व्हिडिओजचा अर्थ सांगण्यास सक्षम करतात, ज्यामुळे संवाद अधिक नैसर्गिकपणे होतो. गॅलॅक्सी एस२५ सिरीजसह तुम्ही संदर्भ-केंद्रित सूचनांच्या माध्यमातून कृतीशील शोध देखील घेऊ शकता. तसेच, गॅलॅक्सी एस२५ सिरीज जीआयएफ शेअर करणे किंवा इव्हेण्ट तपशील सेव्ह करणे अशा त्वरित फॉलो-अप कृतींसाठी सहजपणे अॅप्समध्ये स्विच करण्याची सुविधा देते. हे स्मार्टफोन्स नैसर्गिक भाषा समजामधील ब्रेकथ्रूला सादर करतात, ज्यामुळे दैनंदिन परस्परसंवाद अधिक सोपे होतात. स्मार्टफोन्सना फक्त विचारत सॅमसंग गॅलरीमधील विशिष्ट फोटो शोधता येतात किंवा सेटिंग्जमध्ये डिस्प्ले फॉण्ट्सचा आकार समायोजित करता येतो.
साइड बटन प्रेस व होल्ड करत जेमिनी कार्यान्वित करा आणि सॅमसंग व गुगल अॅप्समध्ये, तसेच स्पोटीफाय सारख्या थर्ड-पार्टी अॅप्समध्ये विनासायास इंटरअॅक्शन परफॉर्म करा. उदाहरणार्थ, तुमच्या आवडत्या स्पोर्ट्स टीमच्या सीझनचे शेड्यूल शोधा आणि सिंगल कमांडसह सॅमसंग कॅलेंडरमध्ये समाविष्ट करा.
गॅलॅक्सी एस२५ सिरीज संवाद, उत्पादकता व सर्जनशीलतेसाठी गॅलॅक्सी एआयच्या लोकप्रिय टूल्समधील अपग्रेड्ससह येते. गुगलचे सर्कल टू सर्च आता स्क्रिनवरील फोन क्रमांक, ईमेल्स आणि यूआरएल त्वरित ओळखू शकते. कॉल ट्रान्सक्रिप्ट आणि सारांशासह कॉल्स संघटित होतात. राइटिंग असिस्टसह तुम्ही कन्टेन्टचा सारांश मिळवू शकता किंवा आपोआपपणे नोट्समध्ये बदल करू शकता. ड्रॉईंग असिस्ट नवीन पद्धती अनलॉक करत स्केचेस्, मजकूर किंवा इमेज प्रॉम्प्ट्सच्या संयोजनाच्या माध्यमातून संकल्पनांना प्रत्यक्षात आणते.
उच्च-वैयक्तिकृत अनुभवांसह गोपनीयतेची सुरक्षितता
गॅलॅक्सी एस२५ सिरीज वैयक्तिकृत एआय वैशिष्ट्यांसाठी पर्सनल डेटा इंजिनसह येते, जे तुमचे प्राधान्यक्रम व वापर पद्धतींनुसार सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी डिवाईसेवरील तुमच्या डेटाचे सुरक्षितपणे विश्लेषण करते. हे इनसाइट्स सर्वोत्तम अनुभव देतात, जसे नैसर्गिक भाषेचा वापर करत गॅलरीमधील जुना फोटो शोधणे किंवा नाऊ ब्रिफसह दिवसभर मार्गदर्शन मिळणे, जे लॉक स्क्रिनवरील नाऊ बार८ च्या माध्यमातून सक्रियपणे सूचना देते.
नॉक्स व्हॉल्टच्या (Knox Vault) माध्यमातून सर्व वैयक्तिकृत डेटा खाजगी व सुरक्षित ठेवला जातो. गॅलॅक्सी एस२५ मध्ये पोस्ट-क्वॉन्टम क्रिप्टोग्राफी देखील आहे, जे उदयोन्मुख धोक्यांपासून वैयक्तिक डेटाचे संरक्षण करते. तसेच क्वॉन्टम कम्प्युटिंग विकसित होण्यासह या सुरक्षतितेमध्ये अधिक वाढ होऊ शकते.
गॅलॅक्सी एस२५ सिरीज सर्वात शक्तिशाली गॅलॅक्सी आहे
गॅलॅक्सी एस२५ सिरीजमध्ये गॅलक्सी एस सिरीजमधील आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली प्रोसेसर स्नॅपड्रॅगन® ८ एलाइट फॉर गॅलॅक्सीची शक्ती आहे, जे पूर्वीच्या जनरेशनच्या तुलनेत एनपीयूमध्ये ४० टक्के, सीपीयूमध्ये ३७ टक्के आणि जीपीयूमध्ये ३० टक्के परफॉर्मन्स बूस्ट देते. प्रोसकेलर डिस्प्ले इमेज स्केलिंग क्वॉलिटीमध्ये ४० टक्के सुधारणा प्राप्त करण्यास मदत करते, तर प्रोसेसरमध्ये एम्बेड केलेले सॅमसंगचे मोबाइल डिजिटल नॅच्युरल इमेज इंजिन (mDNIe) गॅलॅक्सी आयपीचा वापर करत सानुकूल तंत्रज्ञान समाविष्ट करते, ज्यामुळे उत्तम डिस्प्ले पॉवर कार्यक्षमतेची खात्री मिळते. वुल्कन इंजिन आणि सुधारित रे ट्रेसिंग सुलभ आणि अधिक वास्तविक मोबाइल गेमिंगचा आनंद देते.
सर्व प्रखर डिवाईस वापर आणि एआय प्रोसेसिंग सुलभपणे चालते, ज्याचे श्रेय बदलेली उष्णता प्रसरण रचना, तसेच ४० टक्के मोठे वेपर चेम्बर आणि सर्वोत्तम थर्मल इंटरफेस मटेरिअल (टीआयएम)ला जाते, जे थर्मल कार्यक्षमतेमध्ये अधिक सुधारणा देते.
गॅलॅक्सी एस२५ सिरीज देते अस्सल प्रो क्रिएशन
गॅलॅक्सी एस२५ सिरीज हाय रिझॉल्यूशन सेन्सर्स आणि प्रोव्हिज्युअल इंजिनच्या माध्यमातून प्रत्येक रेंजमध्ये अत्यंत सुस्पष्टपणे फोटोज कॅप्चर करते, ज्यामुळे मोबाइल फोटोग्राफीसाठी नवीन मापदंड स्थापित करते. यापूर्वीच्या १२ मेगापिक्सलमध्ये अपग्रेड करण्यात आलेल्या नवीन ५० मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा सेन्सरसह गॅलॅक्सी एस२५ अल्ट्रा अपवादात्मक सुस्पष्टता व वैविध्यता देतो. १०-बीट एचडीआर रेकॉर्डिंग आता डिफॉल्ट वापरण्यात आले आहे, जे ८-बीटच्या तुलनेत चार पट अधिक कलर एक्स्प्रेशन देते. यामुळे हे स्मार्टफोन्स कोणत्याही प्रकाशामध्ये सुस्पष्ट फोटोज व व्हिडिओज कॅप्चर करू शकतात. तसेच, गॅलॅक्सी एस२५ सिरीजसह अंधुक प्रकाशात व्हिडिओज अधिक सुस्पष्टपणे कॅप्चर होतात.
गॅलॅक्सी एस२५ मध्ये व्हिडिओजमधील नको असलेला आवाज काढून टाकण्यासाठी ऑडिओ इरेजर आहे. मोबाइलवर डीएसएलआर-सारख्या अनुभवासाठी हे स्मार्टफोन्स लोकप्रिय एक्स्पर्ट आरएडब्ल्यूमध्ये एकीकृत केलेल्या व्हर्च्युअल अर्पेचरसह डेप्थ-ऑफ-फिल्ड कंट्रोल देतात. गॅलॅक्सी एस२५ सिरीज गॅलॅक्सी लॉगसह सिनेमॅटिक क्रिएटीव्हीटीला नव्या उंचीवर घेऊन जाते, ज्यामधून अधिक प्रोफेशनल व्हिडिओ निर्मितीसाठी अचूक कलर ग्रेडिंग पर्याय मिळतात.
पोर्ट्रेट स्टुडिओ देखील सुधारण्यात आले आहे, जे वापरकर्त्यांना अधिक वास्तविक फेशियल अभिव्यक्तींसह वैयक्तिकृत अवतार डिझाइन करण्यास मदत करते. फिल्टर्समध्ये नवीन अॅनलॉग-स्टाइल फिल्टर्सचा समावेश करण्यात आला आहे, जे फोटोज व व्हिडिओजसाठी चित्रपटासारखी आकर्षकता देतात.
टिकाऊ डिझाइन
गॅलॅक्सी एस२५ अल्ट्रा आतापर्यंतची सर्वात स्लिम, सर्वात हलकी व सर्वात टिकाऊ गॅलॅक्सी एस सिरीज आहे. यामध्ये टिकाऊ टायटॅनिअम आणि नवीन कॉर्निंग® गोरिला® आर्मर २ आहे. गॅलॅक्सी एस२५+ आणि एस२५ च्या प्रत्येक बाह्य घटकामध्ये आता किमान एक रिसायकल केलेले मटेरिअल आहे, जेथे त्यांच्या मेटल फ्रेममध्ये पहिल्यांदाच रिसायकल केलेल्या आर्मर अॅल्युमिनिअमचा समावेश करण्यात आला आहे. ओएस अपग्रेड्सच्या सात जनरेशन्स आणि सात वर्षांच्या सिक्युरिटी अपडेट्ससह गॅलॅक्सी एस२५ सिरीज दीर्घकाळपर्यंत विश्वसनीय व सानुकूल परफॉर्मन्सची खात्री देते.
किंमत आणि उपलब्धता
गॅलॅक्सी एस२५ सिरीजसाठी प्री-ऑर्डर २३ जानेवारीपासून सर्व आघाडीच्या ऑनलाइन व ऑफलाइन रिटेल स्टोअर्समध्ये सुरू होत आहे. ग्राहक आजपासून https://www.samsung.com/in/live-offers/ येथे सॅमसंग लाइव्हवर देखील गॅलॅक्सी एस२५ सिरीज प्री-ऑर्डर करू शकतात.
वैशिष्ट्ये
रॅम/स्टोरेज
रंग
किंमत (रूपयांमध्ये)
गॅलॅक्सी एस२५
१२ जीबी २५६ जीबी
आइसी ब्ल्यू, सिल्व्हर शॅडो, नेव्ही, मिंट
८०९९९
१२ जीबी ५१२ जीबी
९२९९९
गॅलॅक्सी एस२५+
१२ जीबी २५६ जीबी
नेव्ही, सिल्व्हर शॅडो
९९९९९
१२ जीबी ५१२ जीबी
१११९९९
गॅलॅक्सी एस२५ अल्ट्रा
१२ जीबी २५६ जीबी
टायटॅनिअम सिल्व्हरब्ल्यू, टायटॅनिअम ग्रे, टायटॅनिअम व्हाइटसिल्व्हर, टायटॅनिअम ब्लॅक
१२९९९९
१२ जीबी ५१२ जीबी
१४१९९९
१२ जीबी १ टीबी
टायटॅनिअम सिल्व्हरब्ल्यू
१६५९९९
Samsung.com च्या माध्यमातून गॅलॅक्सी एस२५ अल्ट्रा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना टायटॅनिअम जेडग्रीन, टायटॅनिअम जेटब्लॅक आणि टायटॅनिअम पिंकगोल्ड या तीन विशेष रंगांमधून निवड करण्याचा देखील पर्याय मिळेल. Samsung.com च्या माध्यमातून गॅलॅक्सी एस२५ आणि एस२५ प्लस खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ब्ल्यूब्लॅक, कोरालरेड आणि पिंकगोल्ड या तीन विशेष रंगांमधून निवड करण्याचा पर्याय देखील मिळेल.
प्री-ऑर्डर ऑफर्स
गॅलॅक्सी एस२५ अल्ट्रा प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना २१००० रूपयांचे प्री-ऑर्डर फायदे मिळतील. यामध्ये १२००० रूपयांच्या स्टोरेज अपग्रेडचा समावेश आहे, जेथे ग्राहकांना १२ जीबी २५६ जीबी व्हेरिएण्टच्या किमतीमध्ये १२ जीबी ५१२ जीबी व्हेरिएण्ट, तसेच ९००० रूपयांचा अपग्रेड बोनस मिळेल. याव्यतिरिक्त, ग्राहक ९ महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआय प्लॅनसह गॅलॅक्सी एस२५ अल्ट्रा खरेदी केल्यास ७००० रूपयांच्या कॅशबॅकचा आनंद घेऊ शकतात.
गॅलॅक्सी एस२५+ प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना १२००० रूपयांचे फायदे मिळतील, जेथे ग्राहकांना १२ जीबी २५६ जीबी व्हेरिएण्टच्या किमतीमध्ये १२ जीबी ५१२ जीबी व्हेरिएण्ट मिळेल. दरम्यान, गॅलॅक्सी एस२५ प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना अपग्रेड बोनस महणून ११००० रूपयांचे फायदे मिळतील. याव्यतिरिक्त, ग्राहक ९ महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआय प्लॅनसह गॅलॅक्सी एस२५ खरेदी केल्यास ७००० रूपयांच्या कॅशबॅकचा आनंद घेऊ शकतात. सॅमसंग ग्राहकांना गॅलॅक्सी एस२५ आणि गॅलॅक्सी एस२५+ साठी सर्व आघाडीच्या एनबीएफसींच्या माध्यमातून २४ महिन्याच्या नो कॉस्ट ईएमआयचा लाभ घेण्याचा पर्याय देखील देत आहे.


