गुरुग्राम, २९ जानेवारी २०२५ – एयर इंडियाने आज दिल्ली आणि तेल अविव दरम्यान नॉन- स्टॉप सेवा २ मार्च २०२५ पासून परत सुरू करणार असल्याचे जाहीर केले.
एयर इंडियाद्वारे तेल अविव येथे आठवड्याला पाच वेळा सेवा दिली जाईल व त्यासाठी बोईंग 787-8 ड्रीमलायनर एयरक्राफ्टचा वापर केला जातो. या विमानात बिझनेस क्लासमध्ये १८ फ्लॅट बेड्स आणि इकॉनॉमी क्लासमध्ये २३८ प्रशस्त, कुशन्ड सीट्सचा समावेश आहे.
दिल्ली आणि तेल अविव दरम्यान विमानसेवेचे वेळापत्रक
फ्लाइट #
सेवेचे दिवस
सेक्टर
निर्गमन
आगमन
AI139
सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, रविवार
दिल्ली-तेल अविव
1555 Hrs
1925 Hrs
AI140
सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, रविवार
तेल अविव-दिल्ली
2110 Hrs
0610 Hrs+1
+1 दुसऱ्या दिवशी आगमन दर्शवते. सर्व वेळा स्थानिक प्रमाणवेळेनुसार.
दिल्ली आणि तेल अविवदरम्यानच्या विमानसेवेचे बुकिंग सर्व चॅनेल्सवर Air India’s website खुले असून त्याशिवाय मोबाइल अप, ट्रॅव्हल एजंट्स यांचाही समावेश आहे.
दिल्ली- तेल अविव मार्गावर सेवा परत सुरू करण्याचा एयर इंडियाचा निर्णय आवश्यक मंजुरीनुसार आहे.


