Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedविश्वशांतीसाठी व कल्याणासाठी सामुदायिक रामरक्षा पठण ग्रंथ पारायण दिंडी, आधार सोशल...

विश्वशांतीसाठी व कल्याणासाठी सामुदायिक रामरक्षा पठण ग्रंथ पारायण दिंडी, आधार सोशल फाऊंडेशन, चौफेर प्रतिष्ठान व उत्कर्ष महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सलग ९ रविवार आयोजन

 

पुणे : विश्वशांती व भारतीयांच्या कल्याणासाठी तसेच अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मंत्रा (रामरक्षा स्तोत्र) द्वारे पाठबळ देण्यासाठी सामुदायिक रामरक्षा पठणाचे आयोजन तुळशीबाग राममंदिरात सलग ९ रविवार करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी सामुदायिकरीत्या स्तोत्राचे पठण केले. मंत्र व राम नामाच्या जय घोषाने परिसर दुमदुमून गेला.

 

ग्रंथ पारायण दिंडी, आधार सोशल फाऊंडेशन, चौफेर प्रतिष्ठान व उत्कर्ष महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तुळशीबाग राम मंदिरात रामरक्षा स्तोत्र पठण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्रंथ पारायण दिंडीचे विरेंद्र कुंटे, आधार सोशल फाऊंडेशनचे दिलीप काळोखे, चौफरे प्रतिष्ठानच्या वृंदा जोशी, उत्कर्ष महिला मंडळाच्या सविता काळोखे, यांसह श्रीरामजी संस्थान तुळशीबागचे विश्वस्त उपस्थित होते.

 

विरेंद्र कुंटे म्हणाले, श्री रामरक्षेच्या पठणाचे अद्भुत परिणाम सर्वांना ज्ञात आहेत. विश्वशांती व जनतेच्या कल्याणासाठी तसेच प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मंत्रा (रामरक्षा स्तोत्र) द्वारे पाठबळ मिळावे, यासाठी हा संकल्प करण्यात आला. दिनांक ३ डिसेंबर २०२३ पासून प्रत्येक रविवारी (एकूण ९ रविवार) सामुहिक रामरक्षा स्तोत्र, भिमरुपी स्तोत्र पठण व रामनामाचा जप करण्यात आला, असे ही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments