Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedजीवन रक्षा पदक जाहीर झालेल्या तीन्ही विजेत्यांचे* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून...

जीवन रक्षा पदक जाहीर झालेल्या तीन्ही विजेत्यांचे* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन*

 

 

*जिजाऊँ, सावित्रीबाईंच्या कार्याचा, विचाराचा वारसा*

*महाराष्ट्राच्या लेकी आजही समर्थपणे पुढे नेत आहेत*

*उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार*

 

मुंबई, दि. 25 :- आपल्या साहसपूर्ण कृतीतून अन्य व्यक्तीचे प्राण वाचवल्याबद्दल, मानवतावादी कार्यासाठी दिले जाणारे राष्ट्रपतींचे जीवन रक्षक पदक राज्यातील आदिका राजाराम पाटील, प्रियंका भारत काळे आणि सोनाली सुनीन बालोडे या राज्यातील तीन महिलांना जाहीर झाले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. राजमाता जिजाऊँ, क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याचा, विचाराचा वारसा, महाराष्ट्राच्या लेकी आजही समर्थपणे पुढे नेत आहेत, हे महाराष्ट्राला जाहीर झालेल्या तीन जीवन रक्षा पदकांनी सिद्ध केले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी या तीन्ही पदक विजेत्या भगिनींचं कौतुक केले आहे.

०००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments