भारत, ११ फेब्रुवारी २०२५: वर्ष २०२५ मध्ये भारतातील दर १० पैकी ८ हून अधिक (८२ टक्के) व्यावसायिक नवीन नोकरीचा शोध घेत असल्याचे लिंक्डइनच्या ताज्या ग्राहक संशोधनातून दिसून आले आहे. रोजगाराच्या बाजारपेठेत हे प्रोफेशनल्स आपला मार्ग शोधत असतानाच नोकरीचे आमिष देऊन फसवणूक करणाऱ्या ऑनलाइन जॉब स्कॅम्सचे स्वरूप दिवसेंदिवस अधिकाधिक सफाईदार बनू लागले आहे या गोष्टीची नोंद घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नोकरभरतीचे खोटे दावे करणाऱ्यांपासून ते अगदी स्वप्नवत वाटणाऱ्या नोकऱ्यांपर्यंत ही खोटा अभिनय करणारी माणसे नोकरी शोधणाऱ्यांना फसवून आपली खासगी माहिती उघड करायला लावण्यासाठी, किंवा अगदी पैसेही पाठवायला लावण्यासाठी नवनव्या युक्तींचा वापर करत आहेत.
यंदाचा सेफर इंटरनेट डे म्हणजे आपण ऑनलाइन नोकरी शोधताना कोणता दृष्टिकोन बाळगावा – कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी, काय टाळावे आणि कसे सुरक्षित रहावे याचा नव्याने विचार करण्यासाठीचे एक उत्तम निमित्त आहे. तुम्हाला स्कॅम ओळखण्यास, आपली माहिती सुरक्षित ठेवण्यास आणि लिंक्डइनवर नोकरीच्या संधींचा आत्मविश्वासाने शोध घेण्यास मदत करणाऱ्या काही अत्यावश्यक टिप्स येथे देत आहोत.
लिंक्डइनच्या लीगल अँड पब्लिक पॉलिसी विभागाच्या प्रमुख अदिती झा सांगतात, “सेफर इंटरनेट डे म्हणजे आपण इंटरनेटवर आपल्या सुरक्षेत कशाप्रकारे वाढ करू शकतो यावर चिंतन करण्याची एक संधी आहे. लिंक्डइनमध्ये आम्ही लोकांना त्यांच्या नोकरी शोधण्याच्या मोहिमेमध्ये सुरक्षित राहण्यास मदत करण्याशी कटिबद्ध आहोत. नोकरीच्या रिक्त जागांचा शोध घेताना सावधगिरी बाळगणे आणि अर्ज करण्यापूर्वी उपलब्ध असलेली सर्व माहिती पडताळून पाहणे अनिवार्य आहे. या कामी मदत करण्यासाठी आम्ही रिक्त जागा, कंपन्या आणि नोकरभरती करणारे यांच्याविषयीचे पडताळणी केलेले तपशील ठळकपणे पुढे आणणाऱ्या उपाययोजना अंमलात आणल्या आहेत – जेणेकरून नोकरी शोधणाऱ्यांना आपला निर्णय संपूर्ण माहितीनिशी व अधिक आत्मविश्वासाने घेता यावा.”
नोकरीचा शोध सुरक्षितपणे घेण्यासाठी लिंक्डइनच्या टिप्स:
● आपण कोणती माहिती उघड करत आहोत याबाबत दक्ष रहा. तुमच्याकडे कोणत्या वैयक्तिक माहितीची मागणी केली जात आहे हे विचारात घ्या. ऑनबोर्डिंगची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच आपल्या बँकेचे तपशील देऊ नका.
● संशयास्पद मागण्यांना “नाही” म्हणा. घोटाळेबाज माणसे काही अशा क्लुप्त्या वापरतात ज्या अधिकृत कर्मचारी कधीही वापरणार नाहीत, जसे की मुलाखतीसाठी एखादे एनक्रिप्टेड सॉफ्टवेअर डाउनलोड करण्याची मागणी करणे किंवा कमी श्रमांत भरपूर पगार देणारी नोकरी देऊ करणे. फक्त दुरून घेतलेल्या एखाद्या इंटरव्ह्यूच्या आधारे कुणी नोकरी देऊ करते आहे हे अधिकृतपणे घडण्याची शक्यता फारच दुर्मिळ असते. असे प्रकार आढळून आले तर तुम्ही स्पॅम आणि अनुचित कन्टेन्टच्या विरोधात तक्रार करू शकता
● रेड फ्लॅग्जवर लक्ष ठेवा. एखादी नोकरी जरा जास्तच चांगली असल्याचे जाणवत असेल किंवा ती मिळविण्यासाठी लगेचच पैसे भरण्याची मागणी होत असेल तर अशा ऑफर्सपासून सावध रहा. सर्रास आढळून येणाऱ्या स्कॅम्समध्ये मिस्टरी शॉपर, कंपनीचा तोतया प्रतिनिधी किंवा खासगी सहाय्यक यांसरख्या भूमिका करणाऱ्यांचा सहभाग असतो. तसेच, कुणी तुम्हाला पैसे, क्रिप्टोकरन्सी, गिफ्ट कार्ड्स पाठवायला किंवा पैसे गुंतवायला सांगत असेल तर त्यांच्यापासून सावध रहा.
● सेटिंग्ज सदैव अद्ययावत ठेवण्याची काळजी घ्या. आपल्या अकाउन्टमध्ये एखादा अधिकचा फोन नंबर किंवा ईमेल पत्ता दिला तर पासवर्ड विसरायला झाल्यास तुमचे अकाऊन्ट रिकव्हर करायला त्याची मदत होईल.
सुरक्षेत सुधारणा करण्यासाठी लिंक्डइनची साधने:
● जॉब पोस्टिंगबद्दलची अधिकृत माहिती तपासा. रिक्त जागांची माहिती अर्थात जॉब पोस्टिंगवर व्हेरिफिकेशन बॅज असल्यास त्याचा अर्थ ती कंपनी किंवा जॉब पोस्टरवरील माहिती सत्यापित आहे. यातून ते पोस्टर कंपनीच्या अधिकृत पेजशी संलग्न असल्याचे, त्याने एखाद्या विशिष्ट कंपनीशी आपला संबंध असल्याचे सत्यापित केल्याचे किंवा आमच्या ओळखीची पडताळणी करणाऱ्या पार्टनर्सपैकी कुणा एकाच्या माध्यमातून आपली ओळख सत्यापित केल्याचेही कळते.
● मेसेज वॉर्निंगची सूचना चालू ठेवा. लिंक्डइनचे घातक कन्टेन्टचे पर्यायी ऑटोमेटेड डिटेक्शन हा पर्याय सुरू ठेवण्याचा पर्याय निवडा, यामुळे संभाव्य धोकादायक घोटाळे ओळखता येऊ शकतील.
● जॉब्ज विथ व्हेरिफिकेशननुसार पर्यायांना चाळणी लावा. आता तुम्ही सत्यापन केलेले जॉब्स पाहण्यासाठी जॉब सर्च फिल्टर करू शकता. या फिल्टरमुळे तुम्हाला फक्त लिंक्डइनवर व्हेरिफाइड पेज असलेल्या कंपन्यांकडील नोकऱ्यांमधून व चालू जॉब पोस्टर्सवरून नोकरीच्या संधी शोधता येतात. हा पर्याय सुरू केल्यावर केवळ अशाप्रकारे पडताळणी झालेल्या नोकऱ्याच तुमच्या सर्च रिझल्टमध्ये दिसतील आणि हा फिल्टर सर्च हेडरमध्ये दिसत राहील.
● पास की बसवा. पास कीजमुळे तुम्हाला तुमच्या उपकरणासाठीचे अनलॉग वापरण्याची मुभा देते. उदाहरणार्थ, तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवरील टच आयडी वापरून तुम्ही तुमचे अकाउन्ट उघडू शकता. पासकी बसविल्याने तुमचे अकाउन्ट सुरक्षित राहण्यास मदत होतेच, पण त्याचबरोबर तुम्हाला अधिक सहजतेने व पटकन लॉग इन करता येते. पास कीज हे तुम्हाला फिशिंगसारख्या फसव्या कामांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी वापरता येणारे सर्वात प्रभावी साधन आहे.
● टू-स्टेप व्हेरिफिकेशनचा पर्याय सुरू करा. टू-स्टेप व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला तुमचे अकाऊन्ट उघडण्यासाठी एकाहून अधिक व्हेरिफिकेशनचा वापर करावा लागतो आणि बहुतेक अकाउन्ट्समध्ये नव्या किंवा अज्ञात कम्प्युटर वा उपकरणांवरून अनधिकृतरित्या प्रवेश मिळणे कमी होऊ शकते.


