Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedसारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची पालखी मिरवणूक* श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग...

सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची पालखी मिरवणूक* श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे ४१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवाचा समारोप

पुणे : श्री महालक्ष्मी माता की जय… माता माता की जय… च्या जयघोषाने सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. ब्रह्मोत्सवानिमित्त श्री महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची पालखी मिरवणूक थाटात काढण्यात आली. श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीच्या मूर्तींची मंदिराच्या प्रांगणात मिरवणूक काढण्यात आली. पालखी सोहळ्यानंतर पुष्पउत्सव म्हणजेच फुलांची होळी हा अनोखा कार्यक्रम देखील मंदिरात मोठया उत्साहात पार पडला.

श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ४१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ब्रह्मोत्सवात मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, नारायण काबरा, तृप्ती अग्रवाल, रमेश पाटोदिया, निलेश लद्दड, मुरली चौधरी, राजेश सांकला यांसह विश्वस्त उपस्थित होते.

राजस्थान डिडवाना येथील अनंत श्री विभुषित जगतगुरु रामानुचार्य झालरिया पीठाधीपती पूज्य श्री श्री १००८ स्वामीजी घनश्यामाचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा पालखी सोहळा झाला. याशिवाय मंदिरात धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. सोने-चांदी पुष्पअर्पण करुन देवीचरणी सुख-शांती समृद्धीकरीता प्रार्थना करण्यात आली.

उत्सव मूर्तींची धान्यतुला करुन ते धान्य मुळशी तालुक्यातील किरवली, सावरगाव अशा आदिवासी भागांत देण्यात आले. धान्यतुलेमध्ये विविध प्रकारचे धान्य, बिस्कीटे व खाऊ ठेवण्यात आला होता. याशिवाय पुण्यातील ३०० हून अधिक गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींना शैक्षणिक शिष्यवृत्ती देखील देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments