Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंग इंडियाकडून गॅलॅक्‍सी ए०६ ५जी लाँच: किफायतशीर दरामध्‍ये सुपरफास्‍ट कनेक्‍टीव्‍हीटी आणि शक्तिशाली...

सॅमसंग इंडियाकडून गॅलॅक्‍सी ए०६ ५जी लाँच: किफायतशीर दरामध्‍ये सुपरफास्‍ट कनेक्‍टीव्‍हीटी आणि शक्तिशाली कार्यक्षमता असलेला ‘काम का ५जी

गुरूग्राम, भारत – फेब्रुवारी १९, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज गॅलॅक्‍सी ए०६ ५जी च्‍या लाँचची घोषणा केली, जेथे किफायतशीर दरामध्‍ये ऑसम ५जी अनुभव आणला आहे. सर्वात किफायतशीर गॅलॅक्‍सी ए सिरीज ५जी स्‍मार्टफोन गॅलॅक्‍सी ए०६ ५जी विश्‍वसनीय कार्यक्षमता व दीर्घकाळपर्यंत टिकाऊपणासह ग्राहकांना अधिक मूल्‍य देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.

आजपासून गॅलॅक्‍सी ए०६ ५जी भारतभरातील सर्व रिटेल आऊटलेट्स, सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्स, तसेच इतर ऑफलाइन चॅनेल्‍समध्‍ये विविध स्‍टोरेज व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध असेल. ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्‍टोरेज असलेल्‍या व्‍हेरिएण्‍टसाठी फक्‍त १०४९९ रूपयांपासून किंमत सुरू होणारा गॅलॅक्‍सी ए०६ ५जी तीन स्‍लीक व आकर्षक रंगांमध्‍ये येतो – ब्‍लॅक, ग्रे आणि लाइट ग्रीन. स्‍पेशल लाँच ऑफर म्‍हणून ग्राहक फक्‍त १२९ रूपयांमध्‍ये सॅमसंग केअर+ सह एक-वर्ष स्क्रिन प्रोटेक्‍शन प्‍लॅनचा आनंद घेऊ शकतात, ज्‍यामधून अतिरिक्‍त संरक्षण व मन:शांती मिळते.

“गॅलॅक्‍सी ए०६ ५जी च्‍या लॉचंसह आम्‍ही उत्तम ५जी अनुभवासाठी सेगमेंट-लीडिंग १२ ५जी बँड्स आणत आहोत. ऑसम कनेक्‍टीव्‍हीटी, शक्तिशाली कार्यक्षमता आणि सेगमेंट लीडिंग इनोव्‍हेशन्‍स देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेला हा डिवाईस सर्वांसाठी अत्‍याधुनिक तंत्रज्ञान उपलब्‍ध करून देण्‍याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ करतो. या डिवाईससह आम्‍ही खात्री घेत आहोत की, वापरकर्ते काम व मनोरंजनासाठी हाय-स्‍पीड कनेक्‍टीव्‍हीटीसोबत अद्वितीय टिकाऊपणाचा आनंद घेऊ शकतात,” असे सॅमसंग इंडियाच्‍या एमएक्‍स बिझनेसचे महाव्‍यवस्‍थापक अक्षय एस. राव म्‍हणाले.

ऑसम कार्यक्षमता

गॅलॅक्‍सी ए०६ ५जी मध्‍ये सर्व टेलि‍कॉम ऑपरेटर्समध्‍ये सुधारित नेटवर्क कनेक्‍टीव्‍हीटी आणि जलद स्‍पीड्ससाठी सर्व नेटवर्कची कॉम्‍पॅटिबिलिटी, १२ ५जी बँड्स आणि फिचर्स कॅरिअर अॅग्रीगेशन आहे. एमटीके डी६३०० प्रोसेसरची शक्‍ती असलेला गॅलॅक्‍सी ए०६ ५जी शक्तिशाली कार्यक्षमतेची खात्री देतो, तसेच मल्‍टीटास्किंग, गेमिंग व स्ट्रिमिंगचा विनासायास आनंद देतो. या स्‍मार्टफोनमध्‍ये जवळपास १२ जीबी रॅमसह रॅम प्‍लस वैशिष्‍ट्य आहे.

ऑसम कॅमेरा आणि डिस्‍प्‍ले

या डिवाईसमध्‍ये सुस्‍पष्‍ट व आकर्षक फोटोज कॅप्‍चर करण्‍यासाठी ५० मेगापिक्‍सल मेन रिअर कॅमेरा आणि अधिक सुस्‍पष्‍टतेसाठी २ मेगापिक्‍सल डेप्‍थ कॅमेरा आहे, तसेच ८ मेगापिक्‍सल फ्रण्‍ट कॅमेरा उच्‍च दर्जाच्‍या सेल्‍फी व व्हिडिओ कॉल्‍सची खात्री देतो. या स्‍मार्टफोनमध्‍ये स्‍लीक व स्‍टायलिश डिझाइन आहे, तसेच व्‍यापक ६.७ इंच एचडी+ डिस्‍प्‍लेसोबत २०:९ अॅस्‍पेक्‍ट रेशिओच्‍या माध्‍यमातून वैविध्‍यपूर्ण व्हिज्‍युअल अनुभवाची खात्री मिळते. या स्‍मार्टफोनमध्‍ये ५,००० एचएएच बॅटरीसह बेस्‍ट इन सेगमेंट २५ वॅट फास्‍ट चार्जिंग सपोर्ट देखील आहे.

अतूट विश्‍वसनीयता

गॅलॅक्‍सी ए०६ ५जी अँड्रॉईड १५ आणि सॅमसंगच्‍या वन यूआय७सह उपलब्‍ध असेल, ज्‍यामधून वापरकर्त्‍यांना आधुनिक सॉफ्वेअरचा अनुभव मिळेल. सॅमसंग गॅलॅक्‍सी ए०६ ५जी सह विश्‍वसनीयतेला नव्‍या उंचीवर नेत आहे, जेथे ओएस अपग्रेड्सच्‍या ४ जनरेशन्‍स आणि ४ वर्षांचे सिक्‍युरिटी अपडेट्स आहेत. यामधून या सेगमेंटमधील ब्रँडची अद्वितीय कटिबद्धता दिसून येते. हे इंडस्‍ट्री-लीडिंग अपग्रेड्स व अपडेट्स डिवाईसला अद्ययावत ठेवण्‍यास आणि वापरकर्त्‍यांना दीर्घकाळपर्यंत वापराचा उत्‍साहवर्धक अनुभव देण्‍यास सज्‍ज आहेत. टिकाऊपणासाठी डिझाइन करण्‍यात आलेला गॅलॅक्‍सी ए०६ ५जी आयपी५४ रेटिंगसह येतो, ज्‍यामधून धूळ व ओरखड्यांपासून संरक्षणाची खात्री मिळते.

सर्वोत्तम गॅलॅक्‍सी अनुभव

सॅमसंग पहिल्‍यांदाच स्‍मार्टफोनमध्‍ये ‘वॉईस फोकस’ देखील सादर करत आहे. भारतात पहिल्‍यांदाचे हे इनोव्‍हेशन गोंगाटामध्‍ये कॉलदरम्‍यान सुस्‍पष्‍टपणे आवाज ऐकू येण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे, ज्‍यामुळे संवाद सुस्‍पष्‍ट व अधिक प्रभावीपणे करता येतात. या वैशिष्‍ट्यामधून भारतातील ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात येणारे अर्थपूर्ण इनोव्‍हेशन्‍स सादर करण्‍याप्रती सॅमसंगची कटिबद्धता दिसून येते. या डिवाईसमध्‍ये सॅमसंगच्या डिफेन्‍स-ग्रेड नॉक्‍स वॉल्‍ट सिक्‍युरिटीची भर करत सुरक्षितता व गोपनीयतेला प्राधान्‍य देण्‍यात आले आहे. सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍ट वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या डेटाचे सुरक्षितपणे व्‍यवस्‍थापन करण्‍यास सक्षम करते, ज्‍यामुळे त्‍यांचा स्‍मार्टफोन वापरण्‍याचा अनुभव अधिक उत्‍साहपूर्ण होतो.

किंमत आणि लाँच ऑफर्स

उत्‍पादन

रंग

व्‍हेरिएण्‍ट

किंमत (रूपये)

ऑफर्स

गॅलॅक्‍सी ए०६ ५जी

ब्‍लॅक, ग्रे, लाइट ग्रीन

४ जीबी + ६४ जीबी

१०४९९

६९९ रूपयांच्‍या प्रमाणित बाजारपेठ किमतीच्‍या तुलनेत सॅमसंग केअर+ पॅकेजसह १२९ रूपयांमध्‍ये एक वर्ष स्क्रिन प्रोटेक्‍शन प्‍लॅन

४ जीबी + १२८ जीबी

११४९९

६ जीबी + १२८ जीबी

१२९९९

गॅलॅक्‍सी ए०६ ५जी सॅमसंग फायनान्‍स+, एनबीएफसी आणि बँकांच्‍या माध्‍यमातून आकर्षक ईएमआय ऑफर्ससह देखील येतो, जेथे ग्राहक प्रतिमहिना ८७५ रूपये इतक्‍या कमी ईएमआयमध्‍ये स्‍मार्टफोन खरेदी करू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments