• इंटरनॅशनल फेडरेशन ऑन एजिंगने वयोवृद्धत्वाच्या सकारात्मक दृष्टीकोनाचा प्रचार केला आहे परंतु वयाशी संबंधित आजारांची चांगली समज हवी असे त्यांना वाटते[ii]
• शिंगल्स अवेअरनेस वीक २०२५ साठी आज प्रकाशित झालेल्या सर्वेक्षण माहितीतून शिंगल्स आणि त्याच्या प्रभावाबाबत सार्वजनिक आरोग्य शिक्षण वाढवण्याची मागणी
मुंबई, २४ फेब्रुवारी २०२५: एका नवीन जागतिक सर्वेक्षणातून असे दिसते की ५० वर्षे वयावरील सुमारे ५६.६% भारतीय सहभागींना शिंगल्सबाबत फार कमी माहिती आहे किंवा माहिती नाही. परंतु ५० वर्षे वयावरील ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रौढांच्या शरीरात हा विषाणू आहे आणि त्यांच्या आरोग्याला धोका आहे. 1, [iii], [iv] जागतिक स्तरावर फक्त ४४% लोकांना शिंगल्सबाबत थोडी माहिती आहे. 1 शिंगल्स जागरूकता सप्ताहाच्या प्रारंभी (२४ फेब्रुवारी- २ मार्च २०२५) आयोजित केलेल्या या सर्वेक्षणातील निष्कर्षातून वयाशी संबंधित आरोग्याच्या धोक्यांबाबत, विशेषतः आधीच आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींमध्ये मर्यादित जागरूकता असल्याचे अधोरेखित झाले आहे. भारतात सुमारे ६१% प्रतिसादकांनी मधुमेह, सीओपीडी, दमा, कार्डिओव्हॅस्क्युलर आजार किंवा गंभीर मूत्रपिंडाचे आजार असल्याचे नमूद केले आहे. तथापि फक्त ४९.८% लोकांनी शिंगल्स होण्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जागतिक स्तरावर सुमारे ५४% सहभागींना गंभीर आजार होते. परंतु फक्त १३% लोकांनी शिंगल्सबाबत चिंता व्यक्त केली.1
जीएसके इंडियाच्या वैद्यकीय संचालक डॉ. शालिनी मेनन म्हणाल्या की, “आपले वय वाढते तसे रोगांची लढण्याची आपली नैसर्गिक क्षमता कमी होते. त्यामुळे आपण शिंगल्ससारख्या विविध रोगांना जास्त बळी पडू शकतो.[v] वाढते वय आणि गंभीर आजार एकत्र आले की, हा धोका वाढतो.[vi] असे असले तरी ५० वर्षे वयावरील लोकांना या धोक्यांची माहिती नसते असे या सर्वेक्षणातून दिसून आले आहे आणि ही चिंतेची बाब आहे.1 वय वाढणाऱ्या लोकांनी आरोग्यावरील वृद्धत्वाचा परिणाम जाणून घेणे आणि हे धोके ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अंगीकार करणे महत्त्वाचे आहे. यात सकस आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, लक्षणे लवकर ओळखणे, वेळेत आरोग्याची तपासणी करून घेणे आणि आपल्या आरोग्यसेवा पुरवठादारांसोबत लसीकरणाचे पर्याय जाणून घेणे अशा गोष्टी समाविष्ट आहेत.[vii], [viii], [ix], [x] लवकर जागरूक होणे आणि सकारात्मक पावले उचलल्याने आपण आपल्या वयोवृद्ध होमाऱ्या लोकसंख्येसाठी दीर्घकालीन आरोग्यात सुधारणा करू शकतो.”
या सर्वेक्षणातून ५० वर्षे आणि त्यावरील भारतीयांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता व वर्तनात मोठी तफावत असल्याचे दिसून आले आहे.1 या वयोगटातील अर्ध्यापेक्षा जास्त (५६%) प्रतिसादक स्वतःला प्रत्यक्ष वयापेक्षा जास्त तरूण समजतात. त्यातील २४ टक्के लोक दहा वर्षे लहान असल्याचे समजतात तर फक्त २५ टक्के लोकांना वयाशी संबंधित रोगांबाबत जागरूकता आहे आणि ते प्रभाव कमी करण्यासाठी सकारात्मक पावले उचलतात.1 आपले आरोग्य चांगले आहे असे वाटणे आणि प्रत्यक्ष आरोग्य व्यवस्थापनातील ही दरी चिंताजनक ट्रेंड अधोरेखित करते कारण सकारात्मक काळजीच्या अभावामुळे वयाशी संबंधित धोके आणि शिंगल्ससारख्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. सुदृढ वयोवृद्धत्व सवयींबाबत अधिक जागरूकता आणि कृती यांची तात्काळ गरज असल्याचे यातून दिसते.[xi] दि इंटरनॅशनल फेडरेशन ऑन एजिंग (आयएफए)नेही ५० वर्षे आणि त्यावरील लोकांनी आपली प्रकृती व आरोग्यावर जास्त लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत मांडले आहे कारण त्यांची प्रतिकारशक्ती वयानुसार आपोआप कमी होत जाते. 2