स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या वास्तव्याने पावन झालेली व ऐतिहासिक महत्त्व असलेली आणि विद्यार्थ्यांचे स्फूर्तीस्थान असलेली ही खोली बुधवार दिनांक २६.०२.२०२५ रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सकाळी ९.०० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत सर्व नागरिकांना दर्शनासाठी खुली ठेवण्यात येणार आहे अशी माहिती कार्यवाह डॉ. आनंद काटीकर यांनी दिली.
सकाळी ८.४५ वाजता मा. प्रमोद रावत, अध्यक्ष नियामक मंडळ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे फर्ग्यूसन महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना सन १९०२ ते १९०५ या कालावधीमध्ये फर्ग्यूसन महाविद्यालय मुलांचे वसतिगृह क्रमांक १ मधील खोली क्रमांक १७ मध्ये राहत होते. या खोलीमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अर्धपुतळा आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मिळालेल्या डी. लिट. पदवीचे दोन गणवेश ठेवण्यात आले आहेत.