पुणे,
वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी “दीपक राऊत” साहेब व अतिक्रमण चे “सागर विभुते” यांचे मनःपूर्वक अभिनंदन….
आज दुपारी देवदेवेश्वर संस्थान चे विश्वस्त रमेश भागवत यांचा फोन आला व ते दुःखद अंतःकरणाने व्यक्त झाले – *कोथरूड च्या मृत्युंजय मंदिरा लगतच्या पदपथावर अंडाभुर्जीच्या गाड्या लागल्यात*
(आता ह्या गाड्यांवर अनेकदा मासे देखील तळले जातात आणि अनेकजण तेथेच मद्यपान देखील करतात हे उघड सत्य आहे)
मी त्वरित राऊत साहेबांना फोन केला, त्यांनी त्वरित हालचाल केली व तेथे अतिक्रमण ची टीम पोहोचली…. पुढील तासाभरात येथे शिफ्ट केलेल्या गाड्या हलविण्यात आल्या….
ह्याला म्हणतात काम 👌
महाशिवरात्र दोन दिवसावर आली असताना तत्परतेने धर्मस्थळाच्या पावित्र्याचे रक्षण करणाऱ्या ह्या अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन….🙏🤝💐