किवळे येथील मनपा आरक्षण क्रमांक ०४/१२० दवाखाना व प्रसुतीगृह या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ आज सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता चिंचवड विधानभेच्या माजी आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. सदर कार्यक्रमास रा.कॉ.पार्टी शराध्यक्ष, माजी महापौर योगेश बहल, स्थानिक ज्येष्ठ नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, मा.नगरसेविका संगीता भोंडवे, मा.नगरसेविका कु.प्रज्ञा खानोलकर, मा.नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, महानगरपालिका नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड, तसेच स्थानिक ग्रामस्थ, मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.
सदर दवाखाना व प्रसुतीगृह हे ६ मजली इमारत असून खास महिलांसाठी अत्याधुनिक सुख सोयी युक्त असे असून सदर दवाखान्यामध्ये तज्ञ डॉक्टरांची ओपीडी सुविधा, महिला व लहान मुले रक्त तपासणी अत्याधुनिक लॅब, अत्यावश्यक विभाग, डायग्नोस्टिक, पॅथ लॅब आणि कुटुंब नियोजन केंद्र, मल्टीपर्पज हॉल, जनरल वॉर्ड तसेच आधी सुविधांचा समावेश आहे. या दवाखान्याचा लाभ देहूरोड, मामुर्डी, किवळे, रावेत व इतर नजीकच्या लोकवस्तीस होणार आहे.
किवळे येथील दवाखाना व प्रसुतिगृहाचे भूमीपूजन संपन्न
Share with
Tagged in :